शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

By admin | Updated: July 15, 2017 14:44 IST

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १५ : कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर लागवड अवलंबून आहे. मात्र, यावर्षी एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब होत आहे. जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत सरासरी ११७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. ८ आणि ९ जुलै रोजी चांगला पाऊस झाला. मात्र, पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर लागवडीची कामे उरकावी लागत आहेत.जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. पैकी आतापर्यंत ५०४६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जात असली तरी आतापर्यंत ३१९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तृणधान्यापैकी वरीची लागवड २८५ हेक्टरवर करण्यात आली आहे. ८१० हेक्टर क्षेत्रावर कडधान्य लागवड केली आहे. जिल्ह्यात ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येते. पैकी ७१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण ९९ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येत असली तरी आतापर्यंत ५४ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असल्याने ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून कमी राहिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३५० ते ४०० मिलिमीटर पावसाचा फरक राहिल्याने कोरडा पावसाळा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर लागवडीची कामे सुरू आहेत. दिवसातून एखादी सर कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी पंपाचा वापर करावा लागत आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत असून, पावसामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.