शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून ५११ बंधारे पूर्ण

By admin | Updated: November 18, 2016 23:14 IST

पाणीटंचाईवर मात करणार : ग्रामस्थांच्या सहकार्याने शेकडो बंधाऱ्यांची कामे सुरु

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर मिशन बंधारे २०१६ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून बंधाऱ्यांची शेकडो कामे सुरु असून, सुमारे ५११ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात जूनच्या पंधरवड्यामध्ये ११२ गावांतील २०५ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी जांभ्या दगडाच्या जमिनीमुळे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचा चांगला परिणाम उन्हाळ्यात दिसून येतो. बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबणीवर पडली होती. यंदाचे पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात सुमारे ७ हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये वनराई, विजय आणि कच्चे या बंधाऱ्यांचा समावेश आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त कोसळल्याने बंधारे बांधण्याचे काम उशिरा सुरु करण्यात आले. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदिंचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या १० दिवसांमध्ये अनेक ठिकाणच्या गावांमध्ये सुमारे ५११ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात गावोगावी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे शेकडो बंधाऱ्यांची कामे सुरु असून, हजारो लोक विनामोबदला सक्रियपणे या कामात घाम गाळत आहेत. जिल्ह्यात ७ हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बंधारे उभारण्याची कामे सुरू आहेत. (शहर वार्ताहर) जिल्ह्यात ७ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ७ हजार बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले आहे. जास्तीत जास्त बंधारे उभारण्यासाठी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद आणि कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख हे तालुक्यांमध्ये ग्रामसेवक व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त बंधारे उभारण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. तसेच बंधारे बांधकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीही देत आहेत.