शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘आमआदमी’ना राजापुरात ५ लाख ४० हजारांची मदत

By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST

केंद्र शासनाची योजना : १८ कुटुंबांना मिळाला लाभ

राजापूर : केंद्र शासनाच्या आमआदमी योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील १८ कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजारप्रमाणे ५ लाख ४० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आम आदमी योजना सुरु असून, एक एकरापेक्षा कमी बागायती व पाच एकरपेक्षा कमी जिरायती शेती असलेल्या ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.आमआदमी या योजनेला पात्र असलेल्या कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास ३५ हजार रुपये, दोन्ही डोळे व पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा व पाय निकामी झाल्यास ३७ हजार रुपयांची मदत देण्यात येते.राजापूर तालुक्यात या योजनेतून दीपिका बिर्जे (शीळ), अश्विनी बेहेरे (चुना कोळवण), रश्मी रघुनंदन नारकर, मंदा महादेव मांजरेकर (जैतापूर), प्रिया प्रकाश कणेरी (अणसुरे), नम्रता नंदकुमार कोरगावकर (वाडीखुर्द), शालिनी चंद्रकांत जाधव (कळसवली), सुप्रिया नांदगावकर (अडविरे), रक्षिता शिरगावकर (तुळसुंदे), प्रमिता मणचेकर (सागवे), अन्नपूर्णा दैत (ओणी), सीमा भाटकर (जांभारी), सुनीता पोवार (धोपेश्वर), जयश्री पडवळ (मूर), रंजना नाडणकर (शिवणे बु.), मीनल लोळगे (गोठणे दोनिवडे), सुलोचना शिंदे (धोपेश्वर) यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आमआदमी योजनेचा लाभ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर घ्यावा. तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आमआदमी योजना राबविण्यात येत आहे.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजापूर तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक कुटुंबाला ३० हजारांची मदत.दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारकांना मिळतो योजनेचा लाभ.कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास मिळते ३० हजारांची मदत.