शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 00:40 IST

आतापर्यंत ८८ अर्ज : जिल्हा परिषदेसाठी १४ व पंचायत समितीसाठी ३० नामनिर्देशन पत्रे

अडरे : चिपळूण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (रविवारी) पाचव्या दिवशी एकूण ४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १४ तर पंचायत समितीसाठी ३० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी प्रांत कार्यालयाबाहेर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज मालदोली जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून मयुरी शिर्के, पेढे गटासाठी शिवसेनेकडून दीप्ती महाडिक, भाजपकडून अर्चना थत्ते, खेर्डी गटासाठी शिवसेनेकडून सुजाता खेडेकर, अलोरे गटासाठी भाजपकडून हेमंत करंजवेकर, पोफळी गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीरा खेतले, सावर्डे गटासाठी राष्ट्रवादीकडून युगंधरा राजेशिर्के, भारिप बहुजन महासंघातर्फे मुजफ्फर मुल्लाजी, भाजपतर्फे तानाजी लाखण, रामपूर गटासाठी शिवसेनेतर्फे ऋतुजा खांडेकर, कळंबट गटासाठी राष्ट्रवादीतर्फे निकीता सुर्वे, राष्ट्रवादीतर्फे आदिती मोहिते, शिवसेनेतर्फे रश्मी दळवी, कोकरे गटासाठी भाजपतर्फे स्नेहा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पंचायत समिती मालदोली गणासाठी भाजपतर्फे सुरेश गोलमडे, कोंढे गणासाठी राष्ट्रवादीतर्फे अनिल चिले, शिवसेनेतर्फे सुनील तटकरे, पेढे गणासाठी शिवसेनेतर्फे ऋतुजा पवार, नांदिवसे गणासाठी भाजपतर्फे गणेश गजमल, खेर्डी गणासाठी शिवसेनेतर्फे अनिल दाभोळकर, कापसाळ गणासाठी अपक्ष अंजली गमरे, शिवसेनेतर्फे सुप्रिया जाधव, अलोरे गणासाठी काँग्रेसतर्फे रवींद्र भुवड, भाजपतर्फे विनोद सुर्वे, ओवळी गणासाठी भाजपतर्फे सानिया शिंदे, टेरव गणासाठी भाजपतर्फे मानसी कदम, पोफळी गणासाठी राष्ट्रवादीतर्फे अभिषेक साळवी, सावर्डे गणासाठी राष्ट्रवादीतर्फे पूजा निकम, भाजपतर्फे पूनम जाधव, दहिवली बुद्रुक गणासाठी राष्ट्रवादीतर्फे मानसिंग महाडिक, राष्ट्रवादीतर्फे नयन सुर्वे, भाजपतर्फे सतीश घाग, रामपूर गणासाठी शिवसेनेतर्फे अनुजा चव्हाण, कळंबट गणासाठी शिवसेनेतर्फे संजिवनी खापरे, भाजपतर्फे भाग्यश्री पडवळकर, राष्ट्रवादीतर्फे आदिती भागडे, राष्ट्रवादीतर्फे प्रज्ञा बळकटे, मुर्तवडे गणासाठी शिवसेनेतर्फे संजीवनी जावळे, भाजपतर्फे सानवी भागडे, राष्ट्रवादीतर्फे सुप्रिया निवाते, राष्ट्रवादीतर्फे संचिता केंबळे, कोकरे गणासाठी भाजपतर्फे निकीता निर्मळ व कुटरे गणासाठी भाजपतर्फे वसंत झोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चिपळूण तालुक्यात एकूण ८८ अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. सोमवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. (वार्ताहर)