शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह योजनेचे ३१ लाभार्थी

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना : शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यभूत

रत्नागिरी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. शालेय विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. २००३पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्या २८, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान वितरीत करण्यात आले. शासनाने २००३मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत होता. त्यानंतर सर्व रक्कम विमा कंपनीला देण्यात येत असे. अशा विद्यार्थ्यांला अपघात झाला तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असे. मात्र, योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षात या योजनेत बदल करण्यात आले. विम्याच्या हप्त्याची विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम शासनाकडून भरण्यात येत आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला किरकोळ अपघात झाला, तर अनुदान देण्यात येत नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्याना गरज असतानाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यालाच मदतीचा हातभार लाभतो. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाला प्रत्येकी ७५ हजार, तर अपंगत्व आलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याला ३० हजार रुपये देण्यात येतात.ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांची घरे यातील अंतर लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच वर्षात २८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर तीन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. २०१०-११ मध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले. २०११-१२ मध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू , २०१२ - १३ मध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१३ - १४मध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१४ - १५ मध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू व दोघांना अपंगत्व, २०१५ - १६ मध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या २८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तर तीन अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)तेरा वर्षे : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ठरतेय मोलाचीराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेने गेल्या १३ वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे हे प्रमाण नगण्य असले तरीही ज्या विद्यार्थ्यांना या घटनेतून जावे लागले, त्यांच्यासाठी ही योजना आणि या योजनेतून होणारे आर्थिक सहाय्य मोलाचे ठरत आहे.