शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

आंबा उत्पादकांचे तीनशे कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2015 00:37 IST

परतफेडीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : यंदा नुकसानीचा मोठा फटका बसलेल्या आंबा व्यवसायासाठी बागायतदारांनी ३०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. या कर्जाच्या परतफेडीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रांवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे यातील ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रांवरील पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रांवर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे त्यातील ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दरवर्षी आंबा, काजू बागायतदार औषध फवारणी, खते, वाहतूक या सर्व गोष्टींसाठी कर्ज घेतात. यंदा राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांमधून जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बागायतदारांनी ३०० कोटींचे कर्ज (कॅश क्रेडिट) घेतले आहे. आंब्याचे नुकसान झाल्यामुळे सरकारने भरपाईपेक्षा १०० टक्के कर्जमाफी करावी, अशी मागणी आंबा बागायतदार संघटनेने केली होती. सात-बारावर असलेल्या अनेक नावांमुळे याआधी नुकसानभरपाईचे ४८ कोटी रुपये परत गेले आहेत. त्यामुळे भरपाई देताना महसुली निकष न लावता घेतलेले कर्ज शंभर टक्के माफ करावे, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य करण्याऐवजी सरकारने जिल्ह्याला ७९ कोटी रुपये भरपाई जाहीर केली आहे. त्यापैकी ३३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्तही झाला आहे. कर्जमाफीचा मुद्दा कोठेही पुढे न आल्याने बागायतदारांना ३० जूनअखेर कर्जाची पूर्ण परतफेड करणे गरजेचे होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. कर्जमाफीचा निर्णय झालेला नसला तरी झालेले नुकसान लक्षात घेता आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीत चर्चेअंती कर्ज परतफेडीसाठी ३० जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बागायतदार निराश नुकसानभरपाईसाठी आंबा पिकाला हेक्टरी भरपाईचा निकष लावू नये, अशी मागणी असतानाही हेक्टरी २५ हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाल्यामुळे आंबा उत्पादक निराश झाले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई नाकारण्याची चर्चा आता बागायतदारांमध्ये सुरू आहे.