शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी ते धामणदिवी दरम्यान २५ हजार वृक्षांची होणार कत्तल

By admin | Updated: February 11, 2016 23:51 IST

खेड तालुका : पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी

श्रीकांत चाळके -- खेड --मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेग घेत आहे. चौपदरीकरणासाठी जमीन संपादन करणे आणि किंमत ठरविणे आदी महत्त्वाच्या कामांना कमालीचा वेग आला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील महामार्गालगतच्या कशेडी ते धामणदिवी दरम्यान सुमारे २५ हजार वृक्षांची कत्तल करण्याचे आदेश येथील वन विभागाला देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे. त्यामुळे चौपदरीकरण कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असेच म्हणावे लागेल.इंदापूर ते झाराप दरम्यान ३६६ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरण कामाचा नारळ फुटल्यानंतर या कामाचा वेग काहीसा कमी झाला होता. मात्र, केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा रत्नागिरी दौरा आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सातत्याने होत असलेल्या चौपदरीकरण कामासाठीच्या महत्वपूर्ण बैठका यामुळे कामाला वेग आल्याचे दिसत आहे. मुंबई येथे मंत्रालयात झालेली चौपदरीकरणासंबंधातील बैठक आणि त्यानंतर तातडीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेली बैठक यांमधील तातडीच्या उपाययोजनांच्या आधारे चौपदरीकरण कामातील अडथळा दूर होण्यास मदत झाली आहे. जमिनीचे मूल्यांकन करणे आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासंबंधीत या बैठकीत चर्चा झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष तातडीने तोडण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी ते धामणदिवी या भागात विविध प्रकारची सुमारे २५ हजार जुनाट झाडे आहेत. त्यातील काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत, तर काही झाडे प्रवाशांना सावली देणारी आहेत. वन विभागाने या झाडांची गणना पूर्ण केली आहे. नुकतीच या झाडांची मोजणी झाली असून, ती तोडण्यासाठी वन विभागाने जोरदार हालचाल केली आहे. याकरिता वनविभाग आता मजुरांच्या प्रतीक्षेत आहे. विविध प्रकराची झाडे आणि फळांची झाडेही यामध्ये आहेत. या झाडांचे मूल्यांकन करून होणारी किंमत संबंधित शेतकरी अथवा मालकांनाच मिळणार आहे. त्यामुळे वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता याच कामामध्ये गुंतून राहणार आहेत.