शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील २२ नद्यांचे होणार शुद्धिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:09 IST

खेड (रत्नागिरी) : प्लास्टिक बंदीच्या महत्वाकांक्षी निर्णयास मिळालेल्या प्रतिसादामुळे तब्बल ७० टक्के प्लास्टिक कमी झाले आहे. यापाठोपाठ आता राज्यातील ...

खेड (रत्नागिरी) : प्लास्टिक बंदीच्या महत्वाकांक्षी निर्णयास मिळालेल्या प्रतिसादामुळे तब्बल ७० टक्के प्लास्टिक कमी झाले आहे. यापाठोपाठ आता राज्यातील प्रमुख २२ प्रदूषित नद्यांचे शुद्धीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, यापूर्वीच्या सरकारने राज्यातील अनेक नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे काम केले. यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या प्रदूषित नद्यांचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, पहिल्या टप्प्यात प्रमुख २२ नद्यांच्या शुद्धीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. चंद्रभागा नदी विकसित करण्यासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यास हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल, असे ते म्हणाले.रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमिनी नापिक होत आहेत. यासाठी रासायनिक खतांवर बंदी घालून सेंद्रीय खतांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकांमध्ये खतनिर्मितीराज्यातील २२७ नगरपरिषद व २७ महापालिकांच्या हद्दीत साचलेल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. या खतावर प्रक्रिया करून राज्यातील शेतकºयांना ५० टक्के सवलतीत खतांचा पुरवठा केला जाईल, असेही कदम यांनी सांगितले.