शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

महिन्यात २१८५ शिक्षकांची बदली

By admin | Updated: September 15, 2014 23:13 IST

खोतगिरीला चपराक : जिल्हा परिषदेत प्रथमच विक्रमी बदल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत २१८५ शिक्षकांची बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच विभागात बदल्या करण्यात आल्या. गतवर्षीपासून शासनाने बदल्यांचे नियम बदलल्याने अनेक कर्मचारी, शिक्षकांची कायमच्या खोतगिरीला आळा बसला. काही शिक्षक, कर्मचारी राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांना हाताशी एकाच तालुक्यामध्ये एकाच शाळेत, कार्यालयामध्ये अनेक वर्षे खोतकी करीत होते. त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर झाला होता. त्याचबरोबर दुर्गम ग्रामीण भागामध्ये असलेल्या काही शिक्षकांना तेथेच खितपत पडावे लागले होते. मात्र, समुदेशनामुळे खोतगिरी मिरवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.शिक्षण विभागाला ग्रामविकासमंत्र्यांकडून बदलीच्या आदेश अचानक येऊन धडकले होते. त्यामुळे शिक्षण विभागाला धावपळ करीत समुदेशन घ्यावे लागले होते. त्यासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर शिक्षकांचे समुपदेशन घेताना रात्री उशिरा मोबाईलवरुन आदेश देण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील सभापती, उपसभापती यांनी बदल्यांच्या अचानक देण्यात आलेल्या आदेशामुळे त्या पुढे घेण्यात याव्यात, अशी सूचना केली होती. संगमेश्वर तालुक्यात समुदेपदशन न करता शिक्षक निघून गेले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने प्रशासकीय मेमो तयार करुन या बदल्यांचे आदेश दिले होते. शिक्षण विभागाने अशा गोंधळामध्येही व्यवस्थितपणे बदल्या पार पाडल्या. शिक्षकांच्या बदल्या २७ जुलै ते २७ आॅगस्ट अशा महिनाभराच्या कालावधीत केल्या. या कालावधीत जिल्ह्यात २१८५ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हास्तरावर मराठी माध्यम मुख्याध्यापकांच्या - २०० बदल्या, उर्दू माध्यम - मुख्याध्यापकांच्या ६०, पदवीधरांच्या पहिल्या टप्प्यात मराठी माध्यम- ६६६, दुसऱ्या टप्प्यात - ७२५ आणि उर्दू माध्यमाच्या ३४ मुख्याध्यापकांच्या बदल्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरही ७०० उपशिक्षकांच्या समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या. समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बदल्यांच्या वेळी काही किरकोळ प्रमाणात शिक्षकांच्या तक्रारी होत्या. मात्र, त्याही सामोपचाराने सोडविण्यात शिक्षण विभागाला यश आले. (शहर वार्ताहर)जिल्ह्यात सुमारे ९००० शिक्षक आहेत. यापैकी २१८५ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. म्हणजेच ३० टक्के शिक्षकांच्या बदल्या केवळ एका महिन्यात करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत.ऐतिहासिक कामगिरीशिक्षण विभागाची ऐतिहासिक कामगिरी.ग्रामविकासमंत्र्यांच्या अचानक आलेल्या आदेशामुळे समुपदेशन घेताना धावपळ.संगमेश्वर तालुक्यातील समुपदेशन न करताना घेतला काढता पाय.गोंधळी वातावरणानंतरही झाल्या बदल्या.