शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या रस्ते विकासासाठी २ कोटी

By admin | Updated: March 18, 2016 23:45 IST

राधाकृष्णन बी. : अतिक्रमण काढलेली जागा नगरोत्थान योजनेतून रस्त्यासाठी विकसित

चिपळूण : तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी विजय राठोड यांनी शहरातील विविध अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली. अतिक्रमण काढलेली जागा रस्त्यासाठी विकसित करण्याकरिता नगर परिषदेला नगरोत्थान योजनेतून २ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून हे रस्ते विकसित केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बहादूरशेख नाका येथील शासकीय जागेवर नव्याने झोपड्या उभारल्या जात असल्याने नगर परिषद प्रशासन व पोलीस बंदोबस्तात पुन्हा या झोपड्या काढल्या जाणार आहेत. शासकीय नियमानुसारच गौण खनिजाचे बाजारमूल्य ठरले आहे. जिल्हानिहाय त्याचे दर वेगवेगळे आहेत. बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन होऊ नये, यासाठी पाचपट दंड आकारणी केली जाते. अवैध उत्खनन न केल्यास कारवाईचा प्रश्नच येणार नाही. याबाबत डंपर चालकांच्या काही समस्या असतील, तर त्यांनी त्या शासनाकडे मांडाव्यात. यापूर्वी गौण खनिजाचे तालुकानिहाय बाजारमूल्य ठरले होते. मात्र, आता जिल्ह्यात एकच दर ठरविण्यात आला आहे. नियमाबाहेर जावून दंडात्मक कारवाई होत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी व गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. समुद्रालगतच्या संवेदनशील भागांमध्ये ७८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महिनाभरात याबाबतची कार्यवाही सुरु होणार आहे. जागेची बिनशेती न करताच झालेली बांधकामे, एकाच जागेची दोनवेळा झालेली बिनशेती आदींबाबत चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे. नगर परिषदेत कायमस्वरुपी अभियंता देण्याची मागणी होती. मात्र, भविष्यात अभियंत्यांची भरती होणार असून, जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये रिक्त असलेल्या जागी त्यांची भरती केली जाणार आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. टेरव येथील अवैध कोळसाभट्टीबाबत पोलीस आणि वन विभागाच्या सहकार्याने येथील भट्टया कायमस्वरुपी बंद होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)