शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

करमणूक करापोटी प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख

By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST

लांजा अव्वल : जिल्ह्यात रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालय अव्वल

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेला ३ कोटी ९५ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ३ कोटी ९५ लाख इतक्या उद्दिष्टापैकी २ कोटी १५ लाख ९४ हजार रूपयांच्या महसूलची (५४.६६ टक्के) भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक महसूल रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने (३० लाख ९१ हजार, ५०.५१ टक्के) इतका मिळविला आहे, तर सर्व तालुक्यात लांजा अव्वल (१ लाख १८ हजार, ६९.४१ टक्के) आहे.जिल्हा करमणूक कर शाखेला २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता ३ कोटी ९५ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्यासह तीन उपविभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे. उपविभाग दापोलीत मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभाग चिपळूणमध्ये चिपळूण, गुहागर, देवरूख (संगमेश्वर) या तीन तालुक्यांचा, तर रत्नागिरी उपविभागात रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे.यावर्षी संपूर्ण जिल्ह्याला ३ कोटी ९५ लाख रूपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर २ कोटी १५ लाख ९४ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात रत्नागिरी उपविभाग पहिला आणि दापोली, चिपळूण अनुक्रमे द्वितीय व तृतीय आहेत. जिल्ह्यात लांजा तालुका प्रथम असून, त्यापाठोपाठ संगमेश्वर आणि गुहागर अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. एप्रिलमध्ये लोकसभा आणि त्यापाठोपाठ चारच महिन्यांनी विधानसभा निवडणूक आल्याने वसुली गतवर्षी पेक्षा कमी झाली आहे. सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ४७ लाख ४४ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ४८ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्च २०१५ पर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास या शाखेकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीरत्नागिरी५४.३०२७.४१५०.४८लांजा१.७०१.१८६९.३९राजापूर५.२०२.३२४४.६२रत्नागिरी उपविभाग६१.२०३०.९१५०.५१एकूण१४७ ६८.५०४६.६०डी. टी. एच२४८१४७.४४५९.४५एकूण३९५२१५.९४५४.६६तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीमंडणगड१.७५०.३७२१.१४दापोली६ २.६८४४.६७खेड२०९.३५४६.७५दापोली उपविभाग२७.७५१२.४०४४.६८चिपळूण४५१७.८५३९.६७गुहागर८४.४९५४.८८संगमेश्वर५.०५२.९५३९.६७चिपळूण उपविभाग५८.०५२५.१९४३.३९ंगतवर्षी उद्दिष्टापेक्षा २७ टक्के अधिक वसुली मार्च अखेर झाली होती. मात्र, आता आॅक्टोबरपर्यंत काही तालुक्यांची वसुली ५० टक्केही झाली नाही. कारण एप्रिल आणि आॅक्टोबरमध्ये निवडणुका आल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. मात्र, यावर्षीही मार्चअखेर जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती नक्कीच होईल.- रवींद्र खानविलकर,सहायक करमणूक कर अधिकारी