शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या हल्ल्यात १५ जखमी

By admin | Updated: March 15, 2015 00:17 IST

भेडशी खालचा बाजार येथील घटना : भीतीने काही ग्रामस्थांच्या नदीत उड्या

साटेली भेडशी : भेडशी-खालचा बाजार येथील दामोदर मंदिराशेजारील कॉजवेजवळ असलेल्या एका मोठ्या झाडावरील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने पंधराजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या सर्व जखमींवर साटेली-भेडशी येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर यातील प्रमिला गवस या महिलेला अधिक उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात पाठविण्यात आले. शनिवारी साटेली-भेडशीचा आठवडा बाजार असल्याने परिसरातील अनेक लोक बाजारात खरेदीसाठी येतात. त्यामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर मोठी वर्दळ असते. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास भेडशी खालचा बाजार येथील कॉजवेलगत असलेल्या झाडावरील मधमाशा अचानकपणे उठल्या. वाऱ्याने फांदी हलून त्या दुखावल्या गेल्याने त्या खूपच आक्रमक झाल्या. त्यावेळी त्या मधमाशांनी येथून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पायी चालणाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी काही ग्रामस्थांनी भीतीने नदीतही उडी घेतली. मात्र, मधमाशांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यानंतर त्यांनी बाजाराच्या दिशेने धाव घेतली. त्यापाठोपाठ मधमाशाही बाजाराच्या दिशेने धावू लागल्या. यावेळी घाबरून रस्त्याशेजारील घरमालकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले. मात्र, मधमाशांनी पंधराजणांचा चावा घेतला. त्यानंतर भेडशी येथील व्यापारी अनिल मोरजकर आणि गणेश स्वार यांनी रस्त्यावरच पुठ्ठ्यांना आग लावून धूर केल्याने मधमाशा पळून गेल्या, अन्यथा आणखी काहीजणांचा चावा घेतला असता. त्यानंतर जखमींना तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य कें द्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. बी. वारंग आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. त्यातील एका रुग्णाला जास्त अस्वस्थ वाटल्याने दोडामार्ग रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने दवाखान्यातील कॉटही कमी पडले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कसरत करून जखमींवर उपचार केले. या मधमाशांच्या हल्ल्यात हरिदास तुकाराम राठोड (साटेली-भोमवाडी), लक्ष्मण काशीराम महालकर, दीक्षा लक्ष्मण महालकर, सुरेश लक्ष्मण गवस (सर्व रा. पिकुळे), मुकुंद रामा गवस (खोक्रल), नारायण सुखदेव डवरी (सावंतवाडी), वैजयंती वासुदेव गवस (खोक्रल), संगीता लालचंद्र राठोड (कामुळवाडी), उर्मिला अंकुश गवस (हेवाळे), महानंद बुधाजी नाईक, उल्हास कृष्णा नाईक (पिकुळे), सत्यवती मुकुंद गवस (खोक्रल), सखाराम गंगाराम झोरे (कामुळवाडी), गंगाराम पांडुरंग मुंज (भेडशी) हे सर्वजण जखमी झाले. या सर्व जखमींना साटेली-भेडशी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर प्रमिला राजाराम गवस (भोमवाडी) यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर अधिक उपचारांसाठी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे. (वार्ताहर)