रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधित १०६ रुग्ण सापडले आहेत. तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ६९ रुग्ण बरे झाले आहेत. १,२६० रुग्ण जिल्हाभरात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून, केवळ २२०० लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्ण, खेड येथे १९, चिपळूणात ३०, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत ३४, राजापुरात ६ आणि लांजात केवळ १ रुग्ण सापडला. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण ७६,१०७ रुग्ण सापडले आहेत.
गेल्या २४ तासात रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. एकूण २,३४५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला असून, त्यांचा मृत्युदर ३.८ टक्के आहे. तर एकूण ७२,५०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२६ आहे.