शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पायाभूत आराखड्यासाठी १०५ कोटी

By admin | Updated: December 16, 2014 23:47 IST

महावितरण कंपनी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

रत्नागिरी : महावितरणकडून पायाभूत आराखडा दोनचे नियोजन करण्यात आले आहे. या आराखड्यांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १०५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नवीन उपकेंद्र बांधणी, उच्चदाब, लघुदाब वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मरची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्रांची कामे सुरू आहेत. कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, त्यापैकी वालोपे उपकेंद्राला अद्याप जागा मिळालेली नाही. याशिवाय ३५२ किमी लघुदाब व ४१५ किमी उच्चदाब वाहिन्या, ३८२ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. तसेच १५१ जुन्या रोहित्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. काही उपकेंद्रात नवीन रोहित्र बसविली जाणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पायाभूत आराखडा दोनकरिता ३६ कोटी ८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. पायाभूत आराखडा एकमध्ये जिल्ह्याला तीन उपकेंद्र मंजूर होती. पैकी जामसंडे उपकेंद्र सुरू झाले आहे, तर रामगड व आचरा उपकेंद्राची कामे अद्याप सुरू आहेत. याशिवाय आराखडा दोनमध्ये नवीन चार उपकेंद्र मंजूर झाली आहेत. फणसगाव (देवगड), भुईवाडा (वैभववाडी), माजगाव (सावंतवाडी), अडेरी (वेंगुर्ला) याठिकाणी उपकेंद्र प्रस्तावित आहेत. ५९२ किमी उच्चदाब, २६८ किमी लघुदाब वाहिन्या, ४३० नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. याशिवाय जुन्या ३५ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहेत.कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. चाफे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवीसह आसपासची गावे समाविष्ट होतात. कोतवडे उपकेंद्रामुळे चाफे उपकेंद्राचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. (प्रतिनिधी)