शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२१; स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:24 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचावृषभ - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. आणखी वाचामिथुन- मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचाकर्क - श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून श्रीगणेश सावध राहण्याची सूचना देत आहेत. आणखी वाचासिंह - मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. आणखी वाचाकन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. तब्बेत चांगली राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल.  आणखी वाचातूळ - आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. असे गणेशजींना वाटते. अपत्यांकडून शुभ समाचार मिळतील. तुमची प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. आणखी वाचावृश्चिक - आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. आणखी वाचाधनु - गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. भावंडांबरोबर चांगले वर्तन राहील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्रमंडळींशी बोलणे होईल. कामात यश मिळेल. तसेच प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. आणखी वाचा  मकर - आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. आणखी वाचाकुंभ - गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. अध्यात्म आणि चिंतन यात प्रगती राहील. मित्र- आप्तेष्ट यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचामीन - श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. स्वजनापासून आज तुम्ही दुरच राहा कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा