शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:43 IST

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.

अलिबाग : तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या विरोधात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करून सात महिने उलटून गेले तरी त्यावर अद्याप काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये २०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली होती. मात्र, या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अ‍ॅड. महेश बैकर यांनी केली होती; परंतु पुराव्यानिशी तक्रार करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर अ‍ॅड. महेश बैकर यांनी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती.ग्रामपंचायत, पंचायत समिती यासह अन्य यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध झालेल्या माहितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये गडबड असल्याचे दिसून आले. या विरोधात प्रथम त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ५ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. ग्रामपंचायतीमध्ये २०१४ ते २०१८ पर्यंतच्या तपासणी अहवालात ग्रामनिधीतून खर्च झालेल्या बहुसंख्य रकमा संशयास्पद आहेत. ग्रामपंचायतीच्या वहीमध्ये ठेकेदाराकडून वसूल केलेली रोख दोन लाख १२ हजार ८२ रक्कम लेखापरीक्षणाच्या वेळेत जमा केलेली नाही. ३१ मार्च २०१७ अखेर रोख वही आणि बँक खाते यामध्ये ६२ हजार ८६० रकमेची तफावत असल्याचे दिसून आले आहे.गावामध्ये मोठ्या प्रमाणात मासळी विक्रीचा व्यवसाय केला जात नाही. एका महिलेसाठी ७३ हजार ५६७ रुपये खर्च करून मच्छीमार्केटसाठी शेड बांधण्यात आली आहे. अंगणवाड्यासाठी प्युअरीट वाटले होते. यासाठी ९९ हजार २०० रुपये खर्च केले आहेत. त्यामध्ये ६२ अंगणवाड्यांना प्युअरीट वाटल्याचे दिसत असले तरी श्रीगावमध्ये एवढ्या अंगणवाड्याच नाहीत, असेही अ‍ॅड. बैकर यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीकडून सांगितले जाते की अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल केली आहे. ते खरे असेल तर त्या संबंधीच्या पावत्या ग्रामपंचायतीने उघड कराव्यात.ग्रामपंचायतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आमच्यावर आरोप केले जात असल्याचे ग्रामसेवक गणेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.स्मरणपत्राकडे दुर्लक्षविकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे पुन्हा आॅडिट करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. बैकर यांनी केली आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या तक्रार अर्जावर काय कारवाई केली याची माहिती अद्याप सात महिने उलटले तरी दिलेली नाही.त्यामुळे अ‍ॅड. बैकर यांनी २ जून २०१९ रोजी पुन्हा रायगड जिल्हा परिषदेला स्मरणपत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यालाही केराची टोपली दाखवल्याची बैकर यांची धारणा झाली आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारRaigadरायगड