शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 7, 2016 03:04 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले

पुरुषोत्तम मुळे, तळारायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले ती प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे.१८६१ मध्ये स्थापना झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जवळपास १५० वर्षे होऊन गेले. तरीही या शाळेचे दगडी बांधकाम अजूनही मजबूत आहे. या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविणारे अनेक विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, यशस्वी उद्योजक, उच्च पदस्थ अधिकारी झाले. माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे थोर व्यक्ती शिक्षण घेऊन येथून बाहेर पडले. आम्ही तळेकर नागरिक अभिमानाने सांगतो की, या दगडी शाळेत डॉ. सी. डी. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. अशीही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा आणि मुलांचा ओढा वाढत चालला आहे. आपल्या प्राथमिक शाळेत सर्व सुविधा आहेत, मोफत शिक्षण आहे, इंग्रजी शिकविणारे शिक्षक उत्तम आहेत. आज अनेक प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. जिल्ह्यातून राज्यातून तळा तालुक्यातील प्राथमिक डिजिटल शाळा पाहण्यासाठी जवळपास २५० ते ३०० प्राथमिक शिक्षक येऊन गेले. तालुक्यातील या शाळेतील गुणवत्ता तसेच इंग्रजीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले ज्ञान, गणित पद्धती यावर खूश होवून शाळांचे कौतुक केले. परंतु हल्ली पालकवर्गाचीच मानसिकता बदलत आहे. त्यांना वाटते माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकले म्हणजे त्याला जास्त इंग्रजी येईल. यापुढे आम्ही शिक्षक काय करणार? अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना समजावून त्यांची मने वळवण्याचा प्रयत्न करतो पण ते काही शक्य होत नाही, असे मुख्याध्यापक सुनील कवळे यांनी सांगितले.जोपर्यंत पालकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होणार नाही, अशी चिन्हे या परिस्थितीवरून दिसत आहेत. शिक्षक प्रयत्न करीत असतात. मात्र पालकांना कळले पाहिजे की प्राथमिक शाळेत देखील नर्सरीसारखे वर्ग सुरू करून या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शह दिला तरच पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढेल, अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि एक दिवस प्राथमिक शिक्षकांची परिस्थिती भयानक होईल असे कवळे म्हणाले.