शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींंची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:47 IST

छताला लागली गळती : नेरळमधील कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? शिक्षक विवंचनेत

- कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायतीमधील ऐनाचीवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतींत गळती लागली आहे. आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ओलमण ग्रामपंचायतीमधील कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केली आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारतीमधील दोन्ही वर्गखोल्यांचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याची गळती वर्गखोल्यात सुरू झाली आहे. हे प्रमाण भरपूर असल्याने वर्गात पाणीच पाणी साचून राहिले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना बसायला जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर नांदगाव ग्रामपंचायतीमधील ऐनाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतही गळती लागली आहे. त्यामुळे त्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, त्यामुळे तेथे असलेले दोन्ही शिक्षक हैराण झाले आहेत. तर विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा, या विवंचनेत शिक्षक आहेत.

त्यात ऐनाचीवाडीमधील शिक्षकांनी आपल्या शाळेच्या इमारतीला प्लॅस्टिक कापड लावून पावसाळ्यातील पाण्याची गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पाणी आत येऊन दोन्ही वर्गखोल्यांमध्ये पसरले आहे. त्यात ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडीमध्ये शाळा भरविण्याएवढी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे बसवून शाळा सुरू ठेवावी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर एका ठिकाणी असलेले समाजमंदिर हे ग्रामस्थांनी सार्वजनिक भांडी भरून ठेवल्याने तेथे जागा निर्माण करण्याचा प्रयत्नही संपला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. 

या दोन्ही शाळांना भेटी देत असताना शाळेच्या सर्व वर्गखोल्यांत पाणी साचले असल्याचे दिसून आले. यापूर्वी शिक्षकांनी शिक्षण विभागाला पावसाचे पाणी आतमध्ये येऊन विद्यार्थ्यांना बसायला अडचण निर्माण होईल याची माहिती दिली होती, तरीही दुरुस्ती करण्याचा विषय पुढे सरकला नसल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी कुठे बसायचे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.- जयवंती हिंदोळा, सदस्या,कर्जत पंचायत समिती

ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडी या दोन्ही ठिकाणी शाळेच्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी सूचना दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आली होती. त्याबाबत आम्ही बांधकाम विभागाला कळविले होते.- जी. बी. हिवरे,प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत