शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा आले, पैसाही आला; गणेशोत्सावता रंगकामातून मिळतोय तरुणांना रोजगार

By निखिल म्हात्रे | Updated: September 12, 2023 20:20 IST

वेगवेगळ्या आकाराच्या रंगाची आरास बाजारात दाखल झाल्याने त्या खरेदी करण्याची ओढही वाढू लागली आहे.

अलिबाग - गणपती बाप्पा पाहुणा म्हणून घरी येणार असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी घराची रंगरंगोटी करण्याची कामे सध्या सुरु आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही रंगकामाची लगबग दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील असंख्य तरुणांच्या हाताला काम मिळाले असून, त्यांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. गणरायाचे आगमन येत्या 19 सप्टेंबर रोजी घरोघरी होणार आहे. गणरायाच्या स्वागताबरोबरच आरस सजावटीची तयारी गावागावात सुरु झाली आहे. 

वेगवेगळ्या आकाराच्या रंगाची आरास बाजारात दाखल झाल्याने त्या खरेदी करण्याची ओढही वाढू लागली आहे. गणरायाचे स्वागत धूमधडाक्यात व्हावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून अनेक ठिकाणी घरे रंगविण्याचे काम सुरु झाले आहे. गावातील घराघरात रंगकाम करण्याची लगबग सुुरू झाली आहे. शहरी भागातदेखील घरांसह इमारतींनादेखील रंगविण्याची कामे वेगाने सुरु झाले आहे. पूर्वी रंगकाम करण्यासाठी बाहेरून कामगार बोलवावे लागत. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील गावागावात रंगकाम करणारे तरुण तयार झाले आहेत. पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दिवसाची मजुरी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. गावागावात तरुणांचा पाच ते सहा जणांचा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून रंगकाम करण्याचे काम घेतले जात आहे. यातून चांगला रोजगार मिळत असल्याने बेरोजगारीचा प्रश्‍नही सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

पूर्वी गणेशोत्सवात रंगकाम करण्यासाठी कामगार मिळत नसत. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, गावागावातून तरुण या कामासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच कामेही वेळेवर होत आहेत.- जयंत वार्डे, ग्रामस्थ.

गणपतीच्या सिजनमध्ये रंगकामातून तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. गावातील काही तरुण एकत्र येऊन घरे रंगविण्याचे काम घेतो. यातून आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळत आहे.- अमर लोंढे, रंगकाम करणारा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRaigadरायगडalibaugअलिबाग