शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 03:18 IST

गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.

आगरदांडा : गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींनाही जीएसटीची झळ बसल्याने त्यांच्या किमतीत वाढ होणार आहे.गणेशमूर्तींवर १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने एक हजार रुपयांच्या मूर्तींना ५४० रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जेवढ्या रकमेची मूर्ती त्याप्रमाणात जीएसटी रकमेचा अतिरिक्त बोजा यंदा गणेशभक्तांना सहन करावा लागणार आहे.मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मूर्तींमध्ये अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात जीएसटीमुळे रंग साहित्य, प्लॅस्टर आॅफ पॅरिस व अन्य साहित्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. सतत पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरला असल्याची खंत कारखानदार अच्युत चव्हाण यांनी व्यक्त केली.महागाईचा फटकामुरुड तालुक्याच्या गावोगावी साठ ते सत्तर गणेश मूर्तिकारांच्या चित्रशाळा आहेत. माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वत:सह कुटुंबीयांना सर्व कामे करावी लागतात.चांगले कलाकार कामगार म्हणून मिळणे दुरापास्त झाले आहे. वाढत्या किमतीमुळे मूर्तींचा आकारही लहान झाला आहे. निरनिराळे देखावेही कमी झाले आहेत.या सर्व कारणांमुळे कार्यशाळेत शाडूच्या मातीपासून बनविण्यात येणाºया मूर्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, या वाढत्या महागाईचा फटका गणेश भक्तांना सहन करावा लागत आहे. नेमकेच कारखानदार सध्या गणेशमूर्ती घडवण्याचे काम करीत आहे.कोकणातील भक्तगण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाकडे परतत असून, मनोभावे गौरी- गणेशोत्सव साजरा केला जातो. महागाईची झळ बसली तरी भक्तांची श्रद्धा मात्र तसूभरही कमी झाली नसल्याचेही मूर्तिकार सांगतात.

टॅग्स :GSTजीएसटी