शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वीर स्थानकावर प्रवाशांची कसरत

By admin | Updated: October 5, 2015 00:29 IST

कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास

दासगाव : कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत गाडी पकडण्याकरिता कसरत करावी लागत आहे. ही समस्या गेली अनेक वर्षांपासून असून कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.कोकण रेल्वेमार्गावरील महाडपासून जवळपास बारा किमी अंतरावर असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर गेली अनेक वर्षांपासून प्रवाशांना एकाच वेळेस दोन गाड्या फलाटावर आल्यास रुळ ओलांडत पलीकडे जावे लागते आणि ट्रेनमध्ये चढावे लागते. महाड या ऐतिहासिक शहराला लांब ठेवून कोकण रेल्वेने वीर दासगावपासून आपला मार्ग कोकणाकडे वळवला आहे. आजही हा एकेरी मार्ग असल्याने अनेक वेळा रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस प्रवाशांना १० ते १५ मिनिटे एखाद्या स्थानकात ताटकळत बसावे लागते. या मार्गावरून जवळपास २५ गाड्या जात असल्या तरी कोकणवासीयांकरिता अवघ्या तीनच तीन गाड्या सोडल्या जातात. यामध्ये दादर-सावंतवाडी आणि राज्यराणी एक्स्प्रेस, दिवा-मडगाव या गाड्यांचा समावेश आहे. बाकी सर्व गाड्या कोकणातून कर्नाटकात जातात. या एक्स्प्रेस गाड्या जात असताना या मार्गावरील बहुतांश स्थानकात रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस लोकल गाड्यांना थांबावे लागते. महाडजवळील वीर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक महाड शहरालगत असले तरी या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीच विशेष सुविधा पुरवलेली नाही.वीर रेल्वे स्थानकात ही स्थिती आठवड्यातून जवळपास तीन ते चार वेळेस निर्माण होते. वीर रेल्वेस्थानकात एकाच बाजूला प्रवाशांना शेड आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस फलाटावर एखादी गाडी उभी असल्यास प्रवाशांना फलाट उतरून पलीकडे जावे लागते. ही स्थिती पलीकडे थांबलेल्या गाडीमधील प्रवाशांची देखील होते. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत फलाटावर चढताना कसरत करावी लागते. रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना देखील दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे मोठ्या शहरातून रेल्वे रुळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या बेजबाबदारपणामुळे वीर रेल्वे स्थानकात मात्र प्रवाशांना रुळावरूनच कसरत करावी लागत आहे. कोकण रेल्वेबाबत अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. वीर रेल्वे स्थानकात दोन्ही बाजूला प्रवासी शेड आणि ओव्हरब्रिज करणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना करावा लागणारा रुळावरील धोकादायक प्रवास थांबणार आहे. (वार्ताहर)