शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनावर श्रमजीवींची धडक

By admin | Updated: August 10, 2016 03:15 IST

आदिवासी समाजाच्या जमिनी बळकाविणाऱ्या बिल्डर लॉबीला लगाम घालायला प्रशासनाकडे वेळ मागूनही वेळ मिळत नाही.

अलिबाग : आदिवासी समाजाच्या जमिनी बळकाविणाऱ्या बिल्डर लॉबीला लगाम घालायला प्रशासनाकडे वेळ मागूनही वेळ मिळत नाही. प्रशासनाने अजूनही न्याय द्यावा, अन्यथा हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेने येथे दिला. प्रशासन आणि सरकारला जाग आणण्यसाठी त्यांनी मंगळवारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचेही निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांनंतरही रायगड जिल्ह्यातील पनवेल, खालापूर, सुधागड, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी, श्रमजीवी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. भारतीय संविधानाने राजकीय व्यवस्थेवर महत्त्वाची जबाबदारी टाकली असताना त्यांच्याकडून ती योग्यपणे निभावली जात नाही. त्यामुळे त्यांना दूषित पाणी, रस्ता, घरकूल, वीज, समाजमंदिर, स्मशानभूमी, पायवाटा यासारख्या मूलभूत सुविधांसह वैयक्तिक लाभांच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे घराखालील जमीन, वनजमीन, कुळांच्या जमिनी, फसवणूक, विक्र ी जमीन फसवणूक, हक्कसोड, बेकायदेशीर जमिनींवर अतिक्र मण करु न धनदांडग्या बिगर आदिवासी बिल्डर लॉबीने बळकावल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे वेळ मागूनही तो दिला नसल्यानेच तुमच्या दाराजवळ यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.अलिबाग येथील क्र ीडाभुवन येथून श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाला सुरु वात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलाव येथे मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे तेथेच सभेत रूपांतर झाले. विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या वेळी मार्गदर्शन केले.याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा चिटणीस संजय गुरव आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)