शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये कामगारांना वाटते लॉकडाऊनची भीती; कोरोनाच्या वर्षपूर्तीला भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 05:55 IST

कामोठे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल झाले हॉटस्पॉट

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात  झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष तीन दिवस पूर्ण  झाले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  दररोज दोनशेपेक्षा जास्त  रुग्ण सापडत असल्याने  पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर बहुतांश नागरिकांकडून कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती  जास्त वाटत असल्याचे मत व्यक्त करत आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. मार्च महिन्यात कोरोना झालेल्या रुग्णांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यात लॉकडाऊन होत असल्याने पनवेलकरांमध्ये  धाकधूक वाढली आहे. गेल्या २४ दिवसात ३ हजार ५६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गत वर्षीच्या प्रमाणात यावर्षी झपाट्याने वाढ होत आहे. अशीच वाढती संख्या असेल तर लॉकडाऊन नक्की लागेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये  सुरु आहे. पुन्हा हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, हॉटेल व्यावसायिक, विविध आस्थापनातील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारी  कामगार, नोकरदारवर्ग  लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. कोरोना झालेला बरा, पण लॉकडाऊन नको, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. कित्येकांच्या नोकऱ्या या लॉकडाऊनमुळे हिरावल्या गेल्या आहेत. आता परत मागील दिवस नकोत, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे. 

गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. येत्या चार दिवसात होळी आली आहे. सणाला जातोय, असे सांगतात. पण आतून लॉकडाऊनची भीती कायम घर करुन आहे. आता तरी आपण मुंबईत अडकून राहू नये, याकरिता येथून काढता पाय घेतला जात आहे.  बिगारी कामगार, रोजंदारीवरील कामगार, गरीब मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे वाटचाल करत आहेत. 

दररोज बिगारी काम करुन माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. गतवर्षी लॉकडाऊन काळात पायीच गाव गाठले होते. टाळेबंदीनंतर कामाला सुरुवात झाली म्हणून मी परत पनवेलला आलो. आता इतर जिल्ह्यात लॉकडाऊन लागत आहे. पनवेललाही लागेल, अशी भीती सतावत आहे.  - अनिल राठोड, कामगार 

गेल्यावर्षी माझी नोकरी गेली. आता तळोजा एमआयडीसी येथे   रोजंदारीवर काम करत आहे. दिवसेंदिवस कोरोना वाढत आहे. यंदाही लॉकडाऊन होईल, अशी भीती वाटत आहे.  गावाकडे परिस्थिती चांगली नाही. हातावर पोट आहे. त्यामुळे लॉकडाऊन यावेळी तरी नको. गतवर्षी खूप हाल झाले आहेत. - अविनाश तोंडरे, कामगार