शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

जिल्ह्यात हजारो तरुणांना रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षणातून १९२ जणांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:56 IST

अलिबाग : राज्य सरकारच्या ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागा’ने नवी कार्यपद्धती स्वीकारून कामाला सुरु वात केल्यावर संपूर्ण राज्यात कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे.

जयंत धुळप अलिबाग : राज्य सरकारच्या ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागा’ने नवी कार्यपद्धती स्वीकारून कामाला सुरु वात केल्यावर संपूर्ण राज्यात कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. पूर्वी या विभागाचे नाव ‘सेवायोजन कार्यालय’ असे होते. १९४५मध्ये या कार्यालयाची स्थापना झाली. १९४८ मध्ये नव्याने कार्यालयाचे कामकाज स्वरूप ठरविण्यात येऊन त्याला व्यापक अर्थ देण्यात आला. १ नोव्हेंबर १९५६पासून सेवायोजन कार्यालये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वित झाली. राज्य शासनाने १ मे १९९०पासून ‘रोजगार व स्वयंरोजगार विभाग’ स्थापन केला. यातून सेवायोजन कार्यालयाचे संघटन, मनुष्यबळ नियोजन, सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार योजना, स्वयंरोजगाराचे धोरण, अंमलबजावणी अशी कामे केली जातात.चार वर्षांत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी १ जुलै २०१५ रोजी याचे नामकरण ‘कौशल्य विकास व उद्योजकता विभाग’ असे करण्यात आले. यातून नाव नोंदणी, पात्रता वाढविणे, व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता माहिती, अपंगांसाठी रोजगार, सेवायोजन क्षेत्राची माहिती, सांख्यिकी तयार करणे, सेवायोजन कार्यालयाचे अधिनियम नुसार काम करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून योजनेत्तर योजना आणि योजनेंतर्गत योजना राबविल्या जातात. रायगड जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत या विभागाने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे.>१९ रोजगार मेळाव्यांतून १३६ उद्योगांत १ हजार ४६१ तरुणांना रोजगार२०१५-१६मध्ये जिल्ह्यातील १ हजार ४४० विविध रिक्त पदांकरिता एकूण सहा रोजगार मेळावे झाले, त्यात ३२ उद्योजक आणि ८०० उमेदवार सहभागी झाले. पैकी ३१९ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली. सन २०१६-१७मध्ये जिल्ह्यातील ३ हजार २९२ विविध रिक्त पदांकरिता एकूण सात रोजगार मेळावे झाले. त्यात ५३ उद्योजक आणि ३ हजार ४२८ उमेदवार सहभागी झाले. पैकी ७३६ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली.२०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ३ हजार २९२ विविध रिक्त पदांकरिता एकूण सात रोजगार मेळावे झाले. त्यात ५३ उद्योजक आणि ३ हजार ४२८ उमेदवार सहभागी झाले. पैकी ७३६ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली. सन २०१७-१८मध्ये जिल्ह्यातील ८२८ विविध रिक्त पदांकरिता एकूण तीन रोजगार मेळावे झाले. त्यात २८ उद्योजक आणि १ हजार ९७ उमेदवार सहभागी झाले. पैकी ३५२ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली.रायगड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सन २०१४-१५मध्ये जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे आयोजन केले. त्यात २३ उद्योजक उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध उद्योग व अस्थापनांतील ४१९ रिक्त पदांच्या भरतीकरिता ५५३ उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी ५४ उमेदवारांना या रोजगार मेळाव्यातून नोकरी प्राप्त होऊ शकली.रोजगार कार्यक्र मासही सकारात्मक प्रतिसादरोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील ९५० तरुण उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते.प्रत्यक्षांत ७०४ तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला. या पैकी ६० टक्केपेक्षा अधिक उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला, तर उर्वरित उमेदवारांनी स्वयंरोजगार स्वीकारला आहे.कौशल्य विकासाकरिता विशेष नियोजनरायगड जिल्ह्यातील एकूण २७ कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचे नियोजन आहे. त्यापैकी ९ प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण सुरू असून तेथे १७ बॅचेसमध्ये ४५० तरुण प्रशिक्षण घेत आहेत.या प्रशिक्षणाच्या पूर्ततेअंती आतापर्यंत १९२ उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे.नवीन पनवेल येथे रोजगार मेळावापनवेल : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रोटरी क्लब आॅफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आॅक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर १८ के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयात हा मेळावा होणार असून विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.