शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये आमदारांनी पाडले काम बंद

By admin | Updated: April 23, 2016 02:07 IST

चौक-कर्जत रस्त्याचे काम झाले असून आता रस्ता सुस्थितीत आहे मात्र रिलायन्स कंपनीने या रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून त्या ठिकाणी फोर जी केबल टाकत आहे

कर्जत : चौक-कर्जत रस्त्याचे काम झाले असून आता रस्ता सुस्थितीत आहे मात्र रिलायन्स कंपनीने या रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून त्या ठिकाणी फोर जी केबल टाकत आहे. या साइडपट्ट्या खोदल्याने पावसाळ्यात हा रस्ता खराब होईल असे आमदार सुरेश लाड यांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनी हे काम बंद पाडले आहे.चौक फाटा ते कर्जत चार फाटा हा रस्ता अत्यंत खराब होता. आमदार सुरेश लाड यांनी प्रयत्न करून हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून बनवून घेतला. सध्या हा रस्ता सुस्थितीत आहे, मात्र रिलायन्स कंपनी या रस्त्याची साइडपट्टी खोदून यामधून फोर जी केबल टाकत आहे हे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आमदार सुरेश लाड याच रस्त्याने जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी हे काम त्वरित बंद करा असे त्या कामगारांना सांगितले. हे काम चालू असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी उभा नव्हता. विशेष म्हणजे १९ तारखेला महावीर जयंतीची सुटी होती आणि त्याच दिवशी हे काम सुरु होते. साइडपट्ट्याखोदून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे काम चालू आहे. पावसाळ्यात यामध्ये पाणी शिरून हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे असे लाड यांचे म्हणणे आहे. तुमच्या केबल टाकण्याला माझा विरोध नाही मात्र रस्त्यापासून काही फुटाचे अंतर सोडून तुम्ही काम करा जेणेकरून रस्त्याला काही बाधा येणार नाही असे सांगितले. याबाबत आमदार सुरेश लाड यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी मोबाइलवर संपर्कसाधला असता त्वरित काम बंद करतो असे सांगितले. याबाबत त्यांचा सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता सत्यनारायण कांबळे यांच्याशी संपर्कहोऊ शकला नाही.