शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीतील कामकाज ठप्प, ४२ कंटेनरचीच वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:01 IST

जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच्या माध्यमातून जेएनपीटी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे.

उरण -  जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच्या माध्यमातून जेएनपीटी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमिवर वाहतूकदारांनी बुधवारपासून सुरू केलेल्या असहकार आंदोलनाचा जबरदस्त फटका जेएनपीटी बंदराला बसला असून चारही बंदरात कंटेनर हाताळणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे जेएनपीटी परिसरात शुकशुकाट पसरला आहे.जेएनपीटी प्रशासनाने १ मे २०१८पासून या डीपीडी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी जेएनपीटीने सुरू केली होती. मात्र काही खासगी बंदरात डीपीडीला काही प्रमाणात अंमलबजावणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी सुरू केलेल्या या डीपीडीचे धोरण जेएनपीटीच्या चारही बंदरातून कंटेनर वाहतूक करणाºया वाहतूकदार आणि त्यांच्या संघटनांना मंजूर नाही. त्यामुळे त्यांनी डीपीडी धोरण लागून करण्याला विरोध दर्शविला आहे. या संदर्भात जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांच्यासोबत अनेकवेळा चर्चा, बैठकाही झाल्या. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.वाहतूकदारांच्या या असहकार आंदोलनामुळे जेएनपीटी आणि जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य चारही बंदरात होणारी कंटेनर वाहतूूक ठप्प झाली होती. चारही बंदरातून दर दिवशी साधारणत: सहा हजार कंटेनरची वाहतूक होते. मात्र आंदोलनामुळे दिवसभरात फक्त ४२ कंटेनरच बंदरात पोहोचल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्यातून देण्यात आली. जेएनपीटी बंदरात डीपीडी धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तसेच चारही बंदरांच्या कामकाजावर आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसल्याचा दावाही जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक व सचिव जयवंत ढवळे यांनी केला.वाहतूकदारांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात डीसीपी राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकही झाली. पण त्यात काही तोडगा निघाला नाही. दरम्यान, विविध वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आणि जेएनपीटीचे अधिकारी यांच्यात उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.बंदचा कृषी व्यापारास फटकाजेएनपीटीविरोधातील वाहतूकदारांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका कृषी व्यापारास बसला आहे. फळे व भाजीपाल्याची आखाती व इतर देशांमध्ये जेएनपीटीमार्गे निर्यात होत असते. गुरुवार, शनिवार व सोमवारी कृषी माल बंदरामध्ये जात असतो. वाहतूकदारांच्या संपामुळे तब्बल २०० कंटेनर रखडले आहेत. यामध्ये हापूस आंब्याच्या १०० कंटेनरचा समावेश आहे. याशिवाय द्राक्ष व इतर भाजीपाल्याची निर्यातही ठप्प होणार असून, शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता एपीएमसीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडnewsबातम्या