शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

माथेरानमधील रोप-वेचे काम लवकरच मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 04:21 IST

अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली.

- मुकुंद रांजणे ।माथेरान : अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली. मुंबई व अन्य भागात नेहमीच मातीचे निरीक्षण मेट्रो ट्रेनसाठी केले जाते ती चाचणी करण्यात आली. सॉईल टेस्टिंगचा उपयोग मातीचे गुण जाणून घेणे आहे, ही माती बांधकामासाठी योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जाते. यासाठी सर्वच अत्याधुनिक यंत्रसामग्री येथे आणण्यात येत आहे. एक ते दीड महिन्यात हे निरीक्षणाचे काम पूर्ण होऊन नंतरच रोप-वेच्या कामाला खºया अर्थाने गती देऊन दीड वर्षात हे रोपवेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे कामगारांनीे सांगितले.निसर्गाने भरभरु न अलौकिक निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते संपत्ती दिलेल्या माथेरानला दृष्टिक्षेपात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायात भर पडण्याबरोबरच सर्वसामान्य मोलमजुरांना देखील आगामी काळ सुगीचा ठरणार आहे. या प्रकल्पाची लांबी ३३०० मीटर इतकी असून उंची ८५० मीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च अपेक्षितआहे.हा मार्ग कर्जत येथील भिवपुरी (डिकसळ) येथून माधवजी पॉइंटपर्यंत येणार आहे. उद्योजक टाटा समूहांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण हे यासाठी तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करणार आहे. गेल्या वीस वर्षापासून माथेरानकर प्रतीक्षेत होते तो प्रकल्प मार्गी लागणार असल्याने एक उत्तम पर्यायी मार्गाची व्यवस्था या निमित्ताने होणार आहे.माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या विनंतीवरून गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी रोपवेसंदर्भात टाटा कंपनीचे अधिकारी हर्षवर्धन गजभिये व कपूर यांच्या सोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.त्यावेळी सहा महिन्यांची मुदत मागितली होती, केंद्र सरकारकडून परवानग्या येणे बाकी होते.आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची टाटा कंपनीकडून ग्वाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे.रायगड जिल्ह्यातील हा प्रथमच एवढा मोठा प्रकल्प उभा रहात असून माथेरानचे खरे वैभव पर्यटकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दृष्टिक्षेपात येणार आहे.प्रवास करताना या माध्यमातून माथेरानच्या चतु:सीमेकडील पॉइंट्सची नयनरम्य दृष्ये प्रवाशांना न्याहाळता येतील.तसेच पर्यटकांची पैसा व वेळेची बचत होऊन पर्यटन व्यवसाय एकंदरीतच वृद्धिंगत होईल असे स्थानिकांचे मत आहे.खूप वर्षे माथेरानकरांना पर्यायी वाहतुकीच्या व्यवस्थेची प्रतीक्षा करावी लागली आहे.रोप -वे च्या माध्यमातून पर्यटनाला चालना तसेच सर्वांचे व्यवसाय आर्थिक उत्पन्न वाढून खºया अर्थाने पर्यटन क्र ांती घडणार आहे. नुकतीच मिनीट्रेन सुरू झाली असून रोप-वेच्या कामास सुरुवात झाल्याने एकंदरीतच स्थानिकांचा आगामी विकासकाळ प्रगतिपथावर आहे.-प्रकाश सुतार, माजी नगरसेवक माथेरानरोप-वेच्या माध्यमातून येथे वाहतुकीची एक पर्यायी व्यवस्था होणार आहे.त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन सर्वांचीच उत्पन्नाच्या बाबतीत प्रगती होईल.हा प्रकल्प मार्गी लागल्यावर स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये कामावर समाविष्ट केल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल.- सुनील शिंदे, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था पुरस्कर्ता, माथेरान

टॅग्स :Raigadरायगड