शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महानगर गॅस पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:56 IST

स्मशानभूमीच्या जागेतूनच ठेकेदाराने टाकली पाइपलाइन

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : महानगर गॅस कंपनी कर्जतमध्ये परवानगी न घेता पाईपलाईन टाकण्याचे काम करीत आहे. काम करीत असलेला ठेकेदार कर्जतमध्ये मालकी असलेल्या जागेच्या मालकांच्या परवानग्या न घेता बिनधास्तपणे गॅस पाइपलाइन टाकत आहे. अशीच पाइपलाइन खासगी स्मशानभूमीच्या जागेतून टाकली. कर्जतमध्ये महानगर गॅस कंपनीतर्फे अंडरग्राऊंड गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.  हे काम ३ मार्च रोजी रात्री स्मशान व्यवस्थापक समिती, कर्जतच्या स्मशानभूमीतील जागेत करण्यात येत होते. स्मशानभूमी ही नोंदणीकृत आहे. या ठेकेदाराने गॅस पाइपलाइनचे काम रात्री ३ मार्च २०२१ रोजी स्मशानभूमीच्या कमिटीची कोणतीही परवानगी न घेता चालू केले होते. वास्तविक या जागेतून पाइपलाइन टाकताना कंपनीने अथवा ठेकेदाराने आमच्याकडे रितसर परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी विनापरवानगी स्मशानभूमीच्या जागेतून पाइपलाइन टाकण्याचे काम चालू केल्याने आम्ही ते रात्री पोलिसांना कळवून थांबवले आहे. आम्हाला विश्वासात न घेता ठेकेदाराने केलेली ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, असे कळविले.या ठेकेदाराला ४ मार्च २०२१ रोजी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकारी किस्ते यांनी काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने जोपर्यंत चुकीचे काम पूर्ववत करीत नाही, तोपर्यंत काम करू नये, असे लेखी आदेश कंपनीला दिले आहेत. तरीसुद्धा रात्री कंपनी आणि ठेकेदार हे काम करत असल्याचे आमची याविषयी तक्रार असून, विनापरवानगी आमच्या जागेतून पाईपलाईन टाकण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्यावर आपणाकडून योग्य ती कारवाई करावी, ही विनंती स्मशान व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर जोशी यांनी संबंधित कार्यालयांना कळवले आहे.