शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘जलशिवार’चे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 00:40 IST

कर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले.

- विजय मांडे, कर्जतकर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले. मात्र खोदण्यात आलेल्या नऊ मातीच्या बंधाऱ्यात थेंबभर पाणी साचत नसल्याने कृषी विभागाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरु वात केली. कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आला. त्यातील टेंबरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावामधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मातीचे बांध आणि लूज बोर्डर खोदण्याचे नियोजन झाले. त्यानुसार आदिवासी वाड्यांच्या परिसरात मातीचे बंधारे खोदले. त्यासाठी जेसीबी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र आदिवासी उपयोजनेमधून तब्बल ४५.९३ लाख रु पये खर्चून बांधलेल्या या मातीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीच साठत नाही. बंधाऱ्यातील पिचिंगला गळतीजामरुंगमध्ये पाण्यासाठी मातीचे ९ बंधारे खोदण्यात आले. मात्र त्यात पाणीच साठत नसल्याने तब्बल ४५.९३ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्यात पाणी साचत नसले तर उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मातीचे बंधारे बनविण्यासाठी खोदकाम केले. यावेळी पाणी वाहून जाऊ नये म्हणून खाली दगडी पिचिंग करण्यात आले, मात्र तरीही पाणी झिरपत असल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले, हे मान्य करावे लागेल. नऊ बंधारे खोदण्यासाठी अनुक्रमे चार लाखांपासून साडेसहा लाखांपर्यंत खर्च झाला आहे.