शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:20 IST

पावसामुळे महाड, पोलादपूरमधील माती भरावाच्या कामाला अडचणी

दासगाव : कोरोनामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण बंद होते. पुन्हा काम सुरू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीकडून हे चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसांपासून अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे ठेकेदार कंपनीला माती भरावाच्या कामात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ते काम लवकर काम पूर्ण होईल आणि कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा होती. काम सुरू झाल्यानंतर अनेक अडीअडचणी येऊ लागल्या. जमीन मालकांचे वाद, वन विभागाच्या असलेल्या जमिनी त्यांच्या नाहरकती आणि कोरोनामध्ये बंद झालेले काम यामध्ये बघता बघता दोन वर्षे निघून गेली. कोरोनानंतर काम सुरू झाले. सध्या दुसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये महाडमधील वीर गाव हद्दीपासून ते पोलादपूर भोगाव या ४५ किलोमीटरच्या अंतरापर्यंत एल ॲण्ड टी या ठेकेदार कंपनीने काम घेतले आहे. या परिस्थितीत कंपनीकडून या विभागात अनेक टप्प्यांत मातीचे भराव, खडीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे २०२१ मध्ये या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची आशा आहे.काम जरी वेगाने सुरू असले तरी आजही या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या भरावाचे कामदेखील आहे. परंतु गेले काही दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे. माती ओली होत असल्याने मातीच्या खोदकाम आणि भराव यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी मातीकाम आहे त्या ठिकाणी या पावसामुळे सध्याच्या परिस्थितीत अडचणी निर्माण होत असल्या तरी ठेकेदार कंपनीकडून लवकरच हा टप्पा पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.