शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:27 IST

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ५६० स्त्री-पुरुष शेतक-यांनी श्रमदान करून चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले आहे.पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना तब्बल २५ ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून, समुद्राचे खारे पाणी गावांच्या भातशेतीत घुसून पुढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या २५ भगदाडांमध्ये चिखलमाती भरून ती बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही, तर येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणाºया मोठ्या उधाणाच्या भरतीचे पाणी याच २५ भगदाडांतून थेट घुसून पुढे शेती पार करून ग्रामस्थांच्या घरात घुसून मोठ्या आपत्तीस सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ विश्वनाथ भगत, महादेव सीताराम थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरुष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून येण्याचे आवाहन केले. त्यास ग्रामस्थ, शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भंगार कोठ्यातील भगदाडे श्रमदानातून बांधली. तीन दिवसांच्या अथक कष्टाअंती शनिवारी संध्याकाळी २५ भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी दिली आहे.संरक्षक बंधाºयांच्या भगदाडांच्या मोजमाप नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागांकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले होते. या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावरही दुरुस्तीची मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड