शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा-इंदापूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:17 IST

दिघी बंदराच्या विकासाला वेग : रस्ते कॉंक्रीटचे झाल्याने प्रवास झाला जलद

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : रायगड जिल्‍ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा - इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून आता पर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.  हा महामार्ग या गावातील पर्यटन,  व्यवसाय, व्यापा-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यात दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी बंदराच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केल्याने या बंदराच्या विकासाला आता वेग प्राप्त झाला आहे.दिघी बंदराचा विकास जेएनपीटी बंदरासारखाच करणार असून, मालवाहतूक  हाताळणीचे पर्यायी केंद्र म्हणून दिघी बंदर विकसित करणार असल्याची घोषणा अदानी ग्रुपकडून करण्यात आल्याने आर्थिक घडामोडींचा वेग प्राप्त झाला आहे.बंदर वाहतुकीसाठी रस्ते हे सुसज्ज असावे यासाठी प्रथम रस्ते एमएसआरडीसीमार्फत विकसित करण्यात आले आहेत. आगरदांडा ते इंदापूर हा सर्व रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला असून, या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या रस्त्यामुळे वाहतूक जलद झाली आहे. दिघी बंदरातील आलेला माल जलद गतीने रेल्वेच्या साह्याने पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर हा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, बंदर विकासाचा हा पहिला टप्पा आहे. 

रस्त्यासाठी ११० कोटी   रुपये खर्च nरायगड जिल्‍ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा- इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.nकेंद्र शासनाच्या माध्यमातून हे रस्ते तयार करण्यात आले असून, जलद गतीने महामार्ग गाठण्यासाठी हा रस्ता खूप उपयोगी पडणार आहे. आगरदांडा ते इंदापूर रस्त्यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, मालवाहतुकीसाठी हा रस्ता मुख्य केंद्र असणारआहे.