शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण; श्रीवर्धनमधील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:09 IST

कोंढेपंचतनमध्ये कोरोनाबरोबरच पाणीटंचाईचे रौद्र रूप

दिघी : मायबाप, सरकार आता तरी पाणी द्या, अशी डोळ्यात पाणी आणणारी विनवणी येथील वृद्ध महिलांकडून केली जात आहे. श्रीवर्धनमध्ये कोरोना संकटाबरोबर पाणीटंचाईचे संकटही रौद्ररुप धारण करीत आहे. एप्रिलच्या मध्यातच पाणी टंचाई भेडसावू लागल्याने कोंढेपंचतन गवळवाडी येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कोंढेपंचतन या गावाचा समावेश आहे. तीनशेहून अधिक लोकसंख्या असणाºया गावात पाणीटंचाई समस्या दरवर्षी कायमची बनली आहे. विशेष म्हणजे याच गावाच्या नावाने कोंढे धरण उशाला आहे. तरी ग्रामस्थांचा घसा मात्र पाण्याविना कोरडा आहे.

कोंढेपंचतन वरचीवाडी (गवळवाडी) येथे भीषण पाणीटंचाई सुरू असून पुढील दोन महिने पाण्यावाचून कसे काढायचे, असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात कुठेही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने दीड-दोन मैल पायपीट करत डोंगर-कपारातून खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी आणत आहेत.

तालुक्यातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासनाकडून अंदाजे एप्रिलमध्ये पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो. व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी दिले जाते. मात्र यंदा वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे पाण्यासाठी वणवण अशा दुहेरी संकटाचा सामना ग्रामस्थ करीत आहेत.कोंढेपंचतन वरचीवाडी या गावाचा टँकर मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला असून त्याला मंजुरी मिळताच गावात टँकर सुरू केले जाईल. - डी.डी. रहाटे, ग्रामसेवक, कोंढेपंचतनगावात कोणतीच पाणीपुरवठा योजना नाही. गावात विहिरी व बोअरवेल नाही. कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनानी लवकरच उपाययोजना करावी. - अशोक दिवेकर, ग्रामस्थ

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई