शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीमुळे महिलांना मिळाला रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:30 IST

मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे शनिवार-रविवार व सलग सुट्टी असल्या की, पर्यटकांची संख्या वाढत आहे.

मुरुड : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे शनिवार-रविवार व सलग सुट्टी असल्या की, पर्यटकांची संख्या वाढत आहे. निळाशार समुद्रकिनारा व सफेद वाळू व आजूबाजूच्या परिसरात नारळ, सुपारीची उंच असे वृक्ष यामुळे मुरुडला पर्यटकांची मोठी पसंती आहे. येथे येणारे पर्यटक हे ठाणे-मुंबई परिसरातील जास्त आहेत. यामुळे शहरी जेवणास कंटाळलेले हे पर्यटक गावठी जेवणाला पसंती देत आहेत. यामुळे मुरुडमधील महिलांना तांदळाच्या भाकरीतून रोजगार उपलब्ध झाला आहे.मुंबईपासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर मुरुड आहे. येथे समुद्रकिनारी सुरूची वने त्यामुळे समुद्राचे आकर्षण सर्व पर्यटकांना आहे. येणारे पर्यटक हे गावठी जेवणाची मागणी करत असून चपातीपेक्षा भाकरीला पसंती देत आहेत. यामुळे काही हॉटेल्स मालकांनी महिलांना तांदळाची भाकरी बनून देण्याचे काम दिले आहे, यामुळे मुरुड शहरातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. एक भाकरी दहा रुपयांप्रमाणे विकली जाते. त्यामुळे येथील महिलांना जास्त आॅर्डर मिळाल्यामुळे मोठा रोजगार घरबसल्या मिळत आहे. याचा कुटुंबाला मोठा आधार होत आहे.भाकरी बनवण्यास वेळ आणि मेहनत लागत असल्याने बहुतांशी हॉटेलमालक महिलांना ही थेट आॅर्डर देतात. त्यामुळे त्यांना तातडीने ग्राहकांची पूर्तता करता येत आहे. भाकऱ्यांची आॅर्डर मिळाल्याने महिलांना मोठा स्वयंरोजगार मिळून आर्थिक साहाय्य मिळत आहे.>भाकरीला मागणीतांदळाच्या भाकरीची मागणी मुरूडमध्ये वाढत आहे. यावरून पर्यटक ग्रामीण भागाकडे तसेच येथील आहाराकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.या भाकरीच्या माध्यमातून महिलाही घरबसल्या संसाराला हातभार लावत आहेत.