शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याणचा निधी बांधकामांवर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:53 IST

तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. महिला बालकल्याणसाठी मंजूर असलेला ३१ लाखांचा निधी तसाच पडून आहे.

विजय मांडेकर्जत : तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. महिला बालकल्याणसाठी मंजूर असलेला ३१ लाखांचा निधी तसाच पडून आहे. तर काही निधी बांधकाम विभागाची देयके अदा करण्यासाठी खर्च केला जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कुपोषण नियंत्रणावर हा खर्च झाला असता तर कर्जत तालुक्यातील बालके कुपोषित दिसली नसती.अंगणवाड्या आणि तेथील बालके यांच्यासाठी मंजूर असलेला निधी खर्च न करणाºया अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांनी केली आहे.शासन पंचायत समिती स्तरावर विविध खात्यांचे अनुशेष देत असते. त्या अनुशेषातील १0 टक्के रक्कम महिला बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी राखून ठेवलेली असते. कर्जत पंचायत समितीच्या अनुशेषाची ती रक्कम ४0 लाख होती, त्यातील ३१ लाखांचा अनुशेष कर्जत पंचायत समितीकडे खर्च न केल्याने शिल्लक आहे. २०१५ मध्ये महिला बालकल्याण विभागासाठी मंजूर असलेली १0 टक्के अनुशेष तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक थुले यांनी बांधकाम विभागाची बिले अदा करण्यासाठी वर्ग करण्यात आले. हा निधी महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांवर खर्च केला असता तर कर्जत तालुक्यातील कुपोषण वाढले नसते आणि राज्य सरकारला कुपोषण निर्मूलनासाठी ७५ लाखांचा निधी देण्याची वेळ आली नसती. तालुक्यात कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र उघडावी लागली होती. त्यातून कर्जत पंचायत समितीने कोणताही धडा घेतला नाही आणि त्यावर्षी महिला बालकल्याण विभागाचा अनुशेष बांधकाम विभागाची बिले अदा करण्यासाठी खर्च केला गेला. हीच कार्यपद्धती कर्जत पंचायत समितीने २०१६ मध्ये कायम ठेवली असून त्यावेळी देखील विद्यमान गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. यावर्षी महिला बालकल्याण विभागाचा १० टक्केचा ३१ लाखांचा अनुशेष कर्जत पंचायत समितीकडे शिल्लक असून महिला बालकल्याण अंतर्गत येणाºया विविध कामांसाठी, कुपोषण निर्मूलनासाठी हा निधी खर्च केला जाऊ शकत असताना तो खर्चाविना पडून आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये वस्तू खरेदी, कुपोषण निर्मूलनासाठी आवश्यक हिमोग्लोबिन टॅबलेट, कुपोषित बालकांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढावे म्हणून अतिरिक्त पोषण आहार, किशोरवयीन मुली,गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी शिबिराचे आयोजन अनुशेष निधीमधून करता येते. महत्वाच्या कार्यक्र मांवर देखील खर्च करण्याची मानसिकता कर्जत पंचायत समितीने दाखवली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जत तालुक्यातील कुपोषण वाढत असून निधी असताना खर्च केला जात नाही? अशी स्थिती कर्जत तालुक्यात प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाला देखील अनुशेष निधी असताना अन्य विभागाचा निधी वर्ग करण्याची प्रथा कर्जत तालुक्यात पाडली गेली असल्याने कर्जत पंचायत समितीला लेखा परीक्षण विभागाने धारेवर धरले आहे.