शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दरीत पडलेल्या महिलेला टॅक्सी चालकांनी काढले बाहेर

By admin | Updated: November 17, 2015 00:30 IST

नेरळ-माथेरान घाट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी एक दुचाकी दरीत जाता जाता वाचली. मात्र त्या दुचाकीवरील महिला ५० फूट दरीत कोसळली.

कर्जत : नेरळ-माथेरान घाट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी एक दुचाकी दरीत जाता जाता वाचली. मात्र त्या दुचाकीवरील महिला ५० फूट दरीत कोसळली. नेरळ -माथेरान टॅक्सी संघटनेच्या दोन टॅक्सी चालकांनी दरीत उतरून त्या पर्यटक महिलेला सुखरूप बाहेर काढले.नेरळङ्क्त- माथेरान घाट रस्त्यावर जुम्मापट्टी ते दस्तुरीदरम्यान रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी घाटात दुचाकीने चढत असताना एका वळणावर त्यांची दुचाकी दरीत जात असताना तेथील लोखंडी रोलिंगवर आदळली. मात्र त्यावेळी महिला दुचाकीस्वाराला काही माहिती होण्याआधी दरीत कोसळली. त्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यासाठी आणलेला रोलर खाली दरीत गेला होता. त्याच ठिकाणी ती महिला दरीमध्ये कोसळली. याची माहिती दस्तुरी नाका येथे टॅक्सी स्टँड कार्यालयात समजली. यावेळी उपस्थित असलेले टॅक्सी चालक तेथे पोहचले. त्यातील बंटी पारटे आणि अनिल सुर्वे हे दोर घेवून खाली दरीत उतरले. साधारण ५० फूट खोल दरीत कोसळलेल्या महिलेला तासभराच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले.मुख्य रस्त्यावर दोर पकडण्यासाठी अनेक टॅक्सी चालक उपस्थित होते. सुखरूप बाहेर निघालेली महिला काहीही न बोलता निघून गेल्याने टॅक्सी चालकांना तिचे नावही समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.