शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

खैरे धरणातील लाखो लिटर पाणी वापराविना

By admin | Updated: April 29, 2017 01:43 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात खैरे धरण आहे. सुमारे १.७९१ द.ल.घ. मी. पाणीसाठा असणाऱ्या या धरणातून पसिरातील गावांना

सिकंदर अनवारे / दासगावमहाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात खैरे धरण आहे. सुमारे १.७९१ द.ल.घ. मी. पाणीसाठा असणाऱ्या या धरणातून पसिरातील गावांना पाणीपुरवठा केल्यानंतरही लाखो लिटर पाणी वापराविना धरणात शिल्लक राहत आहे. या पाण्याचा वापर टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा योजनेमार्फत केल्यास महाड तालुक्यातील दासगाव वहूरसह इतर चार गावे आणि महाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या घोषवाक्याप्रमाणे सध्या महाडकरांची परिस्थिती झाली आहे. महाड तालुक्याच्या पश्चिमेला रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या डोंगराच्या उतारालगत खैरे धरण आहे. १९९३ साली लघुपाटबंधारे विभागामार्फत या धरणाची निर्मिती करण्यात आली. डोंगरातील नैसर्गिक खड्ड्यांमध्ये स्थानिक ओढ्यांचे पाणी अडवून या धरणाची निर्मिती करण्यात आली. कृषी सिंचन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात आलेल्या या धरणाचा वापर पाणीपुरवठ्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रतिदिवस ५ लाख लिटर पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारून खाडीपट्ट्यातील १९ गावे आणि ३० वाड्यांना हा पाणीपुरवठा केला जातो. बारमाही ५ लाख लिटर पाणीउपसा असूनदेखील आतापर्यंत धरणाचा कधीच तळ दिसलेला नाही. महाड शहर आणि दासगाव वहूरसह इतर ४ गावांना कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. दहा महिने मुबलक पाणी देणाऱ्या या कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा शेवटच्या दोन महिन्यांत अडचणीत येतो. पाणीसाठा अपुरा असल्याने दासगाव वहूरसह इतर ४ गावांचा पाणीपुरवठा थांबतो. तर महाड नगरपालिका धरणातील मृतसाठ्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून शहराला पाणीपुरवठा करते. ग्रामीण भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना शहरात पाणीकपात टँकरद्वादे पाणीपुरवठा अशा योजना आखाव्या लागतात. नगरपालिकेला खूप मोठ्या प्रामाणात आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. या पाणीटंचाईवर अद्याप कोणताच ठोस उपाय महाड शहर अगर ग्रामीण भागाला मिळालेला नाही. खैरे धरणातील ववापरात न येणारे लाखो लिटर पाणी जर टंचाई काळात शहर आणि दासगाव वहूरसह इतर केंबुर्ली, साहीलनगर, गंधारपाले, मोहप्रे या चार गावांसाठी उपलब्ध करून दिल्यास दोन महिन्यांच्या या पाणीटंचाईवर मार्ग निघू शकतो. खैरे धरणातून होणारा पाणीपुरवठा दासगाव गावालगत असलेल्या कोसबी गावापर्यंत आलेला आहे. कोसबी ते दासगाव अंतर साधारणपणे ३ कि.मी. इतके आहे. या दरम्यान पाइपलाइन टाकली गेली तर खैरे धरणातील हे पाणी पुढे दासगाव वहूरसह इतर ४ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे महाड शहराला पाणीपुरवठा करणारे शुद्धीकरण प्रकल्प किंजलघर (दादली) हद्दीत आहे. किंजलघर ते कोसबी हे अंतर देखील १० कि.मी.पेक्षा कमी आहे. त्यामुळे खैरे धरणाचा किमान टंचाई काळात पाण्याचा वापर होणे अशक्य नाही. खैरे धरणातून १९ गावे आणि ३० वाड्यांसाठी दर दिवशी ५ लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपसा होऊन देखील धरणाच्या पाण्याची पातळी कधी खाली गेलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे हे पाणी पडीक असते तर लगत असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याची गंभीर समस्या असते. याचा विचार करून शहर आणि महामार्ग लगत ६ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे.