शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा रोह्याला फटका

By admin | Updated: September 26, 2016 02:19 IST

गेले सात ते आठ दिवस रोहे तालुका व शहरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे. शहरालगतच्या चारही डोंगर माथ्यावरून पावसाच्या पाण्याचे

रोहा : गेले सात ते आठ दिवस रोहे तालुका व शहरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे. शहरालगतच्या चारही डोंगर माथ्यावरून पावसाच्या पाण्याचे लोटच्या लोट शहरातील लोकवस्तीत व बाजारपेठेत येत असल्यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. त्यातच नालेसफाईत नापास ठरलेल्या धाटाव एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे येथील कारखान्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. सलग दोन दिवस पावसाने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे १० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज हाती आला आहे. पर्यायाने काही कारखाने दोन दिवस बंद राहणार, अशी माहिती देखील प्राप्त झाली आहे.रोहे तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील चणेरा, भालगाव, घोसाळे, कांटीबोडण, मेढे, खारापटी, यशवंतखार, सानेगाव, नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, धाटाव एमआयडीसीसहित रोहे शहराला पावसाने झोडपून काढले आहे. परतीच्या पावसाचा जबरदस्त तडाखा अनेकांना बसला आहे. आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यातच दोन दिवसापासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. डोंगर विभागात मुक्काम ठोकणाऱ्या पावसामुळे धाटाव एमआयडीसीला प्रचंड फटका बसला. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील औषध निर्मिती करणारी एफडीसी कंपनी व फूड डाय निर्मिती करणारी निलिकॉन, रोहा डाय, बेक केमिकल, युनिकेम या रासायनिक उत्पादन व औषध तयार करणाऱ्या कंपनीत रात्री एकच्या दरम्यान पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. नव्याने सुरू झालेल्या व काम होत असलेल्या लगतच्या कंपन्यांनी मातीभराव मोठ्या प्रमाणात केल्याने तसेच यंदा एमआयडीसीने नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याने पाणी नाले व गटार मार्गाने न जाता रस्त्यावरच तुंबले. त्यातच पावसाचे प्रमाण वाढल्याने बहुतांश कंपनीत मातीमिश्रित पाणी शिरल्याने कारखानदारांची एकच तारांबळ उडाली. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्राला फार मोठा फटका बसला असून अंदाजित दहा कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेला एफडीसीचे असिस्टंट जनरल मॅनेजर एन.एम. कोळेकर व व एच.आर. मॅनेजर फडतरे यांनी दुजोरा दिला आहे. (वार्ताहर)