शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

'कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:43 IST

आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा निर्धार; कर्जतमध्ये जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आॅक्टोबर २०१८ पासून कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन नावाने कुपोषण निर्मूलनासाठी नवीन प्रकल्प सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सहा आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली असून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात या प्रकल्पाअंतर्गत २९ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील ४० अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.कुपोषण निर्मूलनसाठी काम करणाऱ्या दिशा केंद्र या संस्थेची तालुका समन्वयक संस्था म्हणून या प्रकल्पामध्ये निवड झाली असून, दिशाकेंद्र, पंचायत समिती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा प्रकल्प प्रभावीपणे व एका मॉडल स्वरूपात राबवावा, यासाठी आवश्यक तो निधी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिला जाईल, असे मत सहायक प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे यांनी मांडले.कुपोषणामध्ये फक्त पोषण न मिळणे हे एकच कारण नसून गरोदरपणातील काळजी, सहा वर्षापर्यंत मुलांच्या पोषणाची योग्य काळजी, आरोग्य व पोषणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे या सोबतच बालविवाह, दोन मुलांतील जन्माचे अंतर, कुटुंब नियोजन या सर्व बाबींचा एकत्रित परिणामातून कुपोषण वाढते, ते कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत आदिवासी विभागाच्या सल्लागार डॉ. शुभलक्ष्मी यांनी मांडले. साथी संस्था पुण्याचे शैलेश डिखळे व दिशाकेंद्र कर्जतचे अशोक जंगले यांनी ‘कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन’ या प्रकल्पाची माहिती दिली.एकही मूल कुपोषणाचा बळी ठरू नये यासाठी पोषण आरोग्य सेवा सुधारणे, आरोग्य विभाग, बालविकास विभाग, आदिवासी विभाग व महसूल विभागाचे समन्वयातून व गाव पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जाईल असा विश्वास पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण