शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुबार शेतीचे स्वप्न साकारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 02:31 IST

अंबा खोऱ्यातील आरक्षित पाण्यातील कंपन्यांचा कोटा रद्द : ४८.०९ दलघमी पाणी उपलब्ध होणार

जयंत धुळप अलिबाग : अंबा प्रकल्पातील बिगर सिंचनासाठी उपलब्ध होणाºया २७३.२५ दलघमी प्रति वर्ष पाण्याचे पूर्ण आरक्षण झालेले आहे. या आरक्षणातील रिलायन्स एनर्जी लि., शहापूर (४०००. मे. वॅट) प्रकल्पासाठी २०० दललि प्रति दिन, टाटा पॉवर व इतर कंपन्यांचे ६.१४ दललि प्रति दिन पाण्याच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, शासन नियमानुसार ९० दिवसांच्या आत कंपन्यांनी करारनामा केला नसल्याने त्यांचा पाणी कोटा रद्द झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी लेखी अहवालाद्वारे दिली. आजतागायत या कंपन्या अस्तित्वात आलेल्याच नाहीत, त्यामुळे हे पाणी शेतीला मिळण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

शिल्लक पाण्याचा काही भाग भविष्यातील औद्योगिक प्रकल्पासाठी राखून ठेवून उर्वरित पाणी अंबा प्रकल्पाच्या वगळलेल्या डाव्या कालव्याद्वारे होणाºया सिंचनासाठी उपलब्ध करून देता येणे शक्य होईल, असा कार्यालयीन अभिप्रायदेखील या अहवालात गोडसे यांनी नमूद केले आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतीस अंबा खोरे प्रकल्पाचे ४८.०९ दलघमी प्रति वर्ष पाणी उपलब्ध होऊन येथे दुबार भातशेतीचे स्वप्न साकारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून खारेपाटातील शेतकरी श्रमिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखाली अंबा खोरे प्रकल्पाच्या शेतीसाठीच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देत आहेत. त्या लढ्यातील हा महत्त्वपूर्ण यशस्वी टप्पा असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. सुनील नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.सद्यस्थितीत पाणी वापर करीत नसलेल्या कंपन्यांचा पाणी कोटा कमी करून अंबा प्रकल्पाचा सुधारित जललेखा तयार केलेला आहे. या शिल्लक पाण्याचा काही भाग भविष्यातील औद्योगिक प्रकल्पासाठी राखून ठेवून उर्वरित पाणी अंबा प्रकल्पाच्या वगळलेल्या डाव्या कालव्याद्वारे होणाºया सिंचनासाठी उपलब्ध करून देता येणे शक्य होईल, असे या अहवालात गोडसे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.शेतीसाठी पाणीच्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रासाठी पाणी वापरास मान्यता मिळाल्यास औद्योगिक कंपन्यांसाठी बिगर सिंचनासाठी पाणी कुंडलिका नदीमधून अंबा नदीमध्ये थेट ६ कि.मी. लांबीचा बोगदा काढून सोडावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही.च्या बाबींचा विचार करून सद्यस्थितीतील विना वापर पाणी शेतीच्या सिंचनासाठी देणे योग्य राहील, असे या कार्यालयाचे मत रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी अहवालात अखेरीस नमूद केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड