शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दासगाव ते वीर दरम्यान काम रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:44 IST

वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.

दासगाव : दासगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. वीर ते पोलादपूर दरम्यानचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीने घेतले आहे. महाड तालुक्यातील वीर-दासगाव या चार कि.मी. अंतरावर चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत; पण वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र, अनेक अडचणींमुळे हे काम आजही रखडले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायम राहिला आहे. अशा स्थितीत दुसºया टप्प्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मंजुरी देत प्रकल्पग्रस्तांच्या जागा भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या मोबदल्याचेही वाटप सुरू केले. दुसºया टप्प्यातील वीर ते पोलादपूर दरम्यानच्या कामाला सुरुवात झाली. वीर ते दासगाव या दरम्यान असलेल्या जमिनी या वन विभागाच्या आहेत. यातील काही जमिनीवर वन विभागाचे ३५ कलम लागले आहे, यामुळे वन विभागाने या कामास आडकाठी आणली आहे.दासगाव गावातील जवळपास सहा सात-बारा, तर वीर गावातील सहा सात-बारा दाखल्यांवर वन विभागाचा शिक्का आहे. यातील काही जमिनीवर ३५ कलम, तर काही सात-बारा उताºयांवर वने असे नमूद केले आहे. यामुळे या जमिनीवर महामार्गाचे कोणतेच काम करता येणार नाही. याकरिता केंद्र सरकारच्या वन विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यामुळे सद्यस्थितीत हे काम कंपनीकडून स्थगित केले आहे. जर काम सुरू केले, तर वन विभाग यंत्र जप्ती करेल, अशी तोंडी धमकी दिल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या या महामार्ग प्रकल्पाला शासनाच्या वन विभागाकडूनच आडकाठी आणल्याचे दिसून येत आहे.महामार्गाच्या दुसºया टप्प्याचे काम आॅक्टोबर २०१९पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, सातत्याने येणाºया अडचणींमुळे हे काम पुढे जाण्याची शक्यता आहे. आता पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. यामुळे आता हे काम दिलेल्या मुदतीत कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाचा महामार्ग विभाग आता याबाबत काय पावले उचलतो, याकडे लक्ष लागले आहे.या जमिनीवर केवळ वृक्षलागवडवन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीशेजारील खासगी मालकांच्या जमिनी भविष्यातील तरतुदीकरिता तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का आणि वन शब्द नमूद केला आहे. यामुळे या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का असला तरी या जमिनी मालकांच्या ताब्यातच आहेत. या जमिनी वनेत्तर कामासाठी वापरता येत नाहीत, या जमिनीवर केवळ वृक्षलागवड करता येणार आहे. तर महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनींवर वने असा उल्लेख आहे.यापूर्वीही वन विभागाची आडकाठीमहामार्गाच्या दासगाव दरम्यान असलेल्या खिंडीत आजवर अनेक अपघात झाले होते. याचा विचार करून महामार्ग विभागाने काही धोकादायक स्थळे रुंद करण्याचे काम हाती घेतले होते. त्या दरम्यानही वन विभागाने अशाच पद्धतीने आडकाठी आणली होती. आजही ही परवानगी दिलेली नाही. आता महामार्गाचे चौपदरीकरण येथेच अडकले आहे. वन विभागाच्या ताब्यातील या जमिनीवर काम करण्यास वन विभागाने मनाई केली आहे.१००० झाडांची तोड करण्यास परवानगी नाकारलीदासगाव ते वीर विभागात महामार्गाच्या चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.सरकारी काम वर्षभर थांबसरकारी कामाचा अनुभव कायम सर्वसामान्य नागरिकांना येत असतो. अनेक वर्षे आणि अनेक फेºया माराव्या लागत असल्याने, ‘सरकारी काम अन् वर्षभर थांब’ ही म्हण अस्तित्वात आली. याचा अनुभव सरकारी खात्यालाच आता आला आहे. केंद्र शासनाने महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला तत्काळ सर्व परवानग्या दोन महिन्यांत देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप वन विभागाची परवानगी न मिळाल्याने दासगाव ते वीर दरम्यानचे काम रखडल्याने, ‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ हा अनुभव शासनालाच आला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक