शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:30 IST

अलिबाग - वडखळ मार्ग : राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

अलिबाग : अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या महामार्गाच्या रुंदीकरणाकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सुट्टीच्या काळात अलिबागला येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येने या मार्गावर लांब रांगा लागत आहेत. 

अलिबाग तालुक्यात सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौले, तसेच रेवदंड्याला समुद्रकिनारा लाभलेला असून, तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आहेत. त्यातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन सहली लक्षात घेता, या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक होते. त्यासाठी अलिबागच्या सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित अलिबाग ते वडखळ हा २३ किमीचा मार्ग केंद्राने चौपदरीकरणासाठी आपल्याकडे हस्तांतरित केला होता, परंतु भूसंपादनासाठी लागणारी मोठी रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार नसल्याने दुपदरीकरणाचा प्रस्ताव पुढे आला.

परंतु, तोही प्रस्ताव बारगळला. त्यानंतर केंद्राने हा मार्ग परत राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने केंद्राकडून हस्तांतरित करून घेण्यास नकार दिल्याने, आता या मार्गाचे नूतनीकरण कोणी करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या मार्गाचे रुंदीकरण रखडल्याने या मार्गावर सुट्टीच्या काळात वाहतूककोंडी होत असते. हा प्रश्न कधी सुटणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, वरसोली, चौल, रेवदंडा, तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, राजपुरी, आगरदांडा या पर्यटनस्थळी जाण्यासाठी अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचा वापर सर्वच जण करीत असतात. त्यामुळे अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे असताना, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे.    - जितेंद्र म्हात्रे, पर्यटक, मुंबई

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड