शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:39 IST

कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी

रोहा : कुंडलिका नदीला पूर येऊन रोह्यात शुक्रवारी रात्री निर्माण झालेली पूरपरिस्थिती रविवारीही कायम राहिली आहे. शनिवारी रात्री केवळ चार तास नदीची पाणी पातळी ओसरली होती, मात्र पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन पूरपरिस्थिती जैसे थे राहिली आहे. निसर्गाच्या प्रकोपासह मानवी अतिक्रमणाचा फटका रोहेकरांना बसला असून पुराचे पाणी तब्बल ४८ तास राहिले आहे, तर रोठ गावात भरलेले पुराचे पाणी गेले ३ दिवस जैसे थे आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने रोहेकर मात्र चांगलेच चिंतेत आहेत.गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली, पुराचे पाणी रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ आणि धाटाव गावांत शिरले. निसर्गाच्या प्रकोप, लहरी वृत्ती बरोबरच नदी पात्रात झालेल्या मानवी अतिक्रमणाचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव येत आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी अनुक्रमे २९ आणि ४८ तास राहिलेली पूरपरिस्थितीमुळे रोहेकरांना चांगलाच फटका बसला.अष्टमीत पाणी भरल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीच्या दोन्ही बाजूकडील संपर्क खंडित राहिला. पर्जन्यवृष्टीने पूल ओसंडून गेले, वस्तींमधून पाणी शिरले मात्र पाण्याचा निचरा नेहमीप्रमाणेच झाला नाही. यंदा वाढलेली पाणी पातळी दीर्घकाळ राहिली आहे. नदीचा प्रवाह मयार्दीत होण्या मागील कारणांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेणे जरूरी आहे. गेल्या नऊ दिवसात दोन तीन वेळा या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे.नदी संवर्धनात मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे, या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट लोणेरा विद्यापीठाकडून करून घ्यावे अशी आमची मागणी आहे. तसे आॅडिट करण्यास हरकत नाही असे मुख्याधिकारी रोहा यांनी लेखी दिले, मात्र पुढे काहीच केले नाही. हे आॅडिट या संस्थेकडून करून घेऊन त्याबाबतचा अहवाल नागरिकांपुढे खुला करावा.- नितीन परब, अध्यक्ष सिटीझंस फोरम, रोहारोह्यामध्ये २९५.०० मि.मी. पाऊस पडून सुध्दा बाजारपेठमध्ये पाणी आलेल नाही, काही भागात जे पाणी आलय ते सखल भाग असल्याने आलेले आहे. कुंडलिका नदीच्या झालेल्या संवर्धन कामामुळेच सर्व नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.- महेंद्र दिवेकर, उपनगराध्यक्ष, रोहा नगरपरिषदअतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी २९ आणि ४८ तास पूरपरिस्थिती राहिली, नदी पात्रात होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही, पाणी मागे फिरून लागतच्या गावात शिरत आहे.- दिलीप वडके, संस्थापक कुंडलिका नदी संघर्ष समिती

टॅग्स :floodपूर