शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे?; कंपनी-प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:30 IST

सुदर्शन कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेरील सांडपाण्याचा संभ्रम कायम

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल या कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर गेल्या वर्षभरापासून पाणी साचत आहे. अनेक वेळा या पाण्याला पांढरा रंग येतो. मात्र, हे पाणी नेमके कुठून येते, याचा पत्ता आजतागायत एमआयडीसी किंवा प्रदूषण मंडळाला लागलेला नाही. कंपनी आणि शासकीय यंत्रणा एकमेकांवर बोट दाखवत असली तरी या पाण्यासंदर्भात संभ्रम निर्माण होऊन रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होते आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.महाड औद्योगिक वसाहतींतील नाले व गटारात सोडण्यात येणाºया कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील काही कंपन्यांवर कारवाईही करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही अनेक ठिकाणी थेट गटारांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर सध्या पाणी साचले आहे. या पाण्याला फेसासारखा पांढरा रंग आला आहे. सुदर्शन केमिकल कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जिप्सम साठवून ठेवण्यात आला आहे. याचठिकाणी असलेल्या सुरक्षा भिंतीजवळ हे पांढरे पाणी असल्याने प्रदूषण मंडळानेही याच कंपनीला दोषी ठरवत सांडपाणी उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे पाणी आपले नसल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. गेले वर्षभर याबाबत तक्रारी सुरू आहेत. ऐन उन्हाळ्यातही फेसाळयुक्त रासायनिक सांडपाणी या ठिकाणी साचून होते. याच ठिकाणाहून एमआयडीसीची एक सांडपाणीवाहिनी जाते, तिची गळती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, हे पाणी स्वच्छ आणि पिण्याचे असल्याने त्याला पांढरा रंग येणे शक्य नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. यामुळे गळतीच्या पाण्यात कंपनीच्या आवारातील जिप्समचे पांढरे पाणी जमिनीत मुरून बाहेर येत असावे, असा संशय व्यक्त केला जात असला तरी कंपनी मात्र इतरांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे.२०१८ मध्ये याबाबत महाड एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केल्याचे सुदर्शन कंपनीचे व्यवस्थापक बी. एन. कदम यांनी सांगितले. या ठिकाणी साचत असलेले पाणी आपल्या कंपनीचे नसून सांडपाणी वाहिनीला गळती असल्याचे त्यांनी नमूद केले. महाड एमआयडीसीने मात्र सांडपाणी वाहिनीला गळती नसल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी कंपनीची पाइपलाइन नसल्याचे पांढºया रंगाचे पाणी एमआयडीसीचे असण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता एस. एस. गीते यांनी दिले आहे.एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे बी. एल. वाघमारे यांनीही या ठिकाणी पाहणी करून हे पाणी आपले नसल्याचे सांगितले. यामुळे या ठिकाणी नक्की कोणाचे पाणी मुरते आहे? हा प्रश्नच निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक टी. एस. देशमुख यांनी या कंपनीविरोधात आणि कंपनीबाहेरील पाण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. जर प्रदूषण मंडळाने ठोस पावले उचलली नाही तर कारखान्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.महाड एमआयडीसीतील रासायनिक पाण्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र, हे पाणी सुदर्शन केमिकल कंपनीचे नसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे.- जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड