शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचा पांढरा हत्ती

By admin | Updated: September 9, 2016 03:09 IST

जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागजलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सुमारे १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र संरक्षीत झाल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाने केला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्ची पडल्याने एक टीसीएम पाणी संरक्षीत करण्यासाठी तब्बल ८१ हजार ९१७ रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते. निकषाला धरुन वैज्ञानिक पध्दतीने योजना राबविल्यास खर्च कमी होऊ शकतो, असे मत शेतकरी संघटनेच्या प्रतिनीधींनी व्यक्त केले.रायगड जिल्ह्यातमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा प्रचंड गाजावाजा करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४५ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली. २०१५-१६ साठी ९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे ३२ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे सिध्दीविनायक ट्रस्ट आणि साईबाब संस्थान यांनी सुमारे दोन कोटी रुपयांची मदतीचा हात दिला होता.२०१५-१६ या कालावधीत ९९१ पैकी ९२२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे २७ कोटी दोन लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एवढ्या मोठ्या संखेने निधी खर्च केल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी राबविलेल्या या प्रकल्पामुळे तीन हजार २९६.३९ टीसीएम पाण्याचा साठा करण्यात जिल्हा कृषी विभागाला यश आले आहे. या साठलेल्या पाण्याचा वापर १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र भिजण्यास करता येणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधिक्षक विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार प्रकल्पामुळे परिसरातील विहीरी, हौद यांच्या पाणी पातळीत वाढही झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु पाणी साठ्यात वाढ झाली याची मोजदाद कोणी केली, कशी केली असा प्रश्न विविध शेतकरी संघटनांनकडून उपस्थित केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची वैज्ञानिक पध्दतीने अंमलबजावणी केली जात नसल्याचाही संघटनेचा सूर आहे.