शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटी जातात कुठे?

By admin | Updated: February 15, 2017 04:46 IST

राज्यातील मोठ्या जिल्हा परिषदांपैकी एक रायगड जिल्हा परिषद आहे. १५० कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर के ला.

दासगाव : राज्यातील मोठ्या जिल्हा परिषदांपैकी एक रायगड जिल्हा परिषद आहे. १५० कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर के ला. हा खर्च होतो. मात्र, समस्या सुटत नाही. मग हा पैसा जातो कुठे? असा प्रश्न केंद्रीय मंत्रीगीते यांनी शिवसेनेच्या जाहीर सभेत उपस्थित केला. वहूर जिल्हा परिषद मतदार संघ हा मुस्लीम आणि कुणबी बहुसंख्य असल्याचा धागा पकडून त्यांनी काँग्रेसच्या जातीयवादी मुद्द्यांना हात घातला. हिंदू आणि मुस्लीम या देशात एकोप्याने वागले, तर भारत देश जगाच्या पाठीवर समृद्ध देश म्हणून पुढे येईल, असे एकोप्याचे आवाहन मुस्लीम समाजाला करीत, काँग्रेसमधील ब्रिटिशनीती गीते यांनी उघड केली. सोमवारी महाड तालुक्यातील दासगाव येथे शिवसेनेच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार जितेंद्र सावंत, पंचायत समितीचे उमेदवार सदानंद मांडवकर आणि शोएब पाचकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला आ. भरतशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख रवी मुंडे, उपजिल्हाप्रमुख बिपीन महामूनकर, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जि. प. सदस्य बाळ राऊळ, विकास गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.महाडचे आ. भरत गोगावले यांनी न केलेली कामे केली म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा समाचार घेतला. ‘दासगाव येथील दरडग्रस्त, औद्योगिक वसाहतीतून पिण्याचे पाणी हे प्रश्न हे नेते सोडवू शकलेले नाहीत. मात्र, पेपरबाजी केली,’ असा टोमणा आ. गोगावले यांनी लगावला. या परिसराचा विकास शिवसेनाच करेल, असा विश्वास देत, दासगाव येथील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी गीते यांना केली. वहूर, चिंभावे येथील मुस्लीम सरपंच हे शिवसेनेचेच आहेत, असे सांगताना शिवसेना जातीयवादी नाही, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.वहूर जि. प. मतदार संघ सावित्री खाडीमुळे दुभागलेला आहे. दासगाव विभागातील कोकरे ते मोहप्रे ही एक बाजू, तर गोठ्यापासून तुडील, खुटील, गोमेंटी या भागात पसरली आहे. (वार्ताहर)