शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रायगडची महिला संसदेत कधी जाणार? पंधरा वेळा पुरुष खासदारांनीच केले नेतृत्व

By राजेश भोस्तेकर | Updated: March 8, 2024 12:10 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

अलिबाग : १९५२ ते २०१९ या पंधरा लोकसभा निवडणुकीत रायगडमधून एका वेळेस वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडला तर इतर एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवार म्हणून महिलेला संधी दिलेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकसभा, राज्यसभेत महिलांनाही संधी मिळावी यासाठी महिला आरक्षण धोरण संसदेत मंजूर केले आहे. रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत शेकापच्या मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या दोन महिला आमदार झाल्या आहेत. तटकरे मंत्रीही आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे सुमन भास्कर कोळी यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

कोण, किती वेळा लढले?१९८९ ते २०१९ या १५ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी सहा वेळा, शेकापचे दिनकर पाटील दोन वेळा आणि रामशेठ ठाकूर यांनी दोन वेळा असे चार वेळा संसदेत रायगडचे प्रतिनिधित्व केले. शिवसेनेचे अनंत गीते यांनी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी एकदा, तर अपक्ष म्हणून नाना कुंटे यांनी एकदा प्रतिनिधित्व केले आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदWomenमहिला