शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

माथेरानच्या राणीचे स्वागत

By admin | Updated: May 26, 2016 03:03 IST

मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा

माथेरान : मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा धूसर झाल्या होत्या. यासाठी राजकारण बाजूला ठेवून केवळ स्थानिकांच्या उदरनिर्वाहाची गहण समस्या लक्षात घेऊन येथील सर्वपक्षीय नेत्यांनी थेट दिल्ली गाठून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सहकार्याने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन स्थानिकांच्या समस्येबाबत साकडे घातले. त्यावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळेच रेल्वे प्रशासनाला ही हेरिटेज दर्जा प्राप्त मिनीट्रेन अखेरीस सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घ्यावा लागला. बुधवारी (२५ मे) दुपारी १ वाजता एन.डी.एम.४०० हे नवीन इंजिन, सहा एअर ब्रेक बोगी आणि एकूण वीस कामगारांसह माथेरान स्थानकात दाखल झाली. यावेळी माथेरानच्या राणीचे फटाक्यांची आतषबाजी तसेच पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.पंधरा दिवसानंतर माथेरानच्या राणीचे दर्शन हे पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण असल्याने स्थानकात क्षणभर का होईना गाडीत बसण्याचा आणि फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. गाडीचे चालक तसेच सर्वच कामगारवर्गाचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी, प्रसाद सावंत, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणा सावंत आदींसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) सध्या आम्ही गाडी सरावा (ट्रायल) साठी आणली असून या मार्गातील तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा अहवाल वरिष्ठाकडे सादर करून लवकरच ही गाडी आपल्या दिमतीसाठी हजर होईल-एस.बी.सिंग, रेल्वे निरीक्षक, नेरळ आम्हाला हा मार्ग उत्तम स्थितीत दिसत असून आता गाडी येण्यास काहीच अडचण नाही. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल.- शरद सानप, रेल्वे चेकमन, नेरळ माथेरानकर आणि ट्रेन हे एक समीकरण बनलेले आहे. सर्वांचेच जीवनमान गाडीशी निगडित असल्याने आम्ही सदर बाबतीत रेल्वे मंत्र्यांना गाऱ्हाणे सांगितल्यावरून त्यांनी स्थानिकांच्या या प्रश्नावर योग्य निर्णय घेतला असून स्थानिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.- प्रसाद सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख