शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाली नगरपंचायत होण्याचा मार्ग झाला मोकळा; नगरविकास विभागाची अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:57 IST

नगरविकास विभागाची अधिसूचना : तहसीलदारपदी दिलीप रायन्नावार यांची नियुक्ती

विनोद भोईरपाली: अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया मागील साडेपाच वर्षांपासून लालफितीत अडकली होती. मात्र, पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याचे पालीकरांचे स्वप्न आता साकार होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र नगरविकास विभागाने गुरुवारी (ता.३१) जारी केली आहे आणि त्यानुसार नगरपंचायत स्थापित होईपर्यंत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचातीत होण्याची प्रक्रिया झाली होती. मात्र, तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेत नगरपंचायतीची जाहिरात प्रसारमाध्यमात प्रसिद्ध न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्तापित होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसेथे राहिली. या सर्व कालखंडात कधी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. मात्र, लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांच्या विविध समस्या सोडवणुकीस दिरंगाई होत होती.

मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर, जुलै, २०१८ मध्ये ग्रामपंचायतीचा ५ वर्षांचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली. मात्र, यावेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार आदी नागरिकांनी सर्व कागदपत्रासह उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाविरोधात जनहित याचिका दाखल केली.

त्यानंतर, २६ सप्टेंबर, २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नगरपंचायतीची मागणी करत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला होता, तर अपक्ष उमेदवारांनी मात्र नगरपंचायत होईल तेव्हा होईल, हा पवित्रा घेत, ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. त्याचप्रमाणे, अपक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. ग्रामपंचायतिचे कामकाज आत्तापर्यंत सुरू राहिले.

 

टॅग्स :Raigadरायगड