शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यापासून ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:34 IST

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

- गिरीश गोरेगावकर माणगाव : गोरेगाव देवळी ३२ गाव योजना गेल्या महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. या गावातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागले आहे. ही योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत चालू आहे. मात्र, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळेच या ३२ गावांतील नागरिकांना पाणीपुरवठ्याची नामुष्की ओढावली आहे.या योजनेअंतर्गत गोरेगावपासून देवळीपर्यंत आणि देवळीपासून वडपालेपर्यंत तर दुसºया बाजूकडे गोरेगावपासून बाकी-हुर्डी-काचले-टोलपर्यंत ही योजना २७ वर्षांपूर्वी पोहोचली आहे. ही योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत चालू असून गेली दोन ते तीन वर्षे कागदावर चालू आहे खरी; मात्र वारंवार काहीना काही तांत्रिक कारणांनी बंद पडत असते. २७ वर्षांपूर्वी चालू झालेली योजना चांगली सुरू झाली; पण गेली काही वर्षे कधी पाइप फुटला, कधी पाइप जॉइंट लिक झाला, कधी वॉल लिकेज तर कधी मोटार बिघाड, अशा अनेक करणांमुळे बंद पडते. यामुळे या योजनेचा गावाला फायदा होत नाही. ही पाणीपुरवठा योजना गोरेगाव येथील काळ नदीच्या धारणावर वाढलेली आहे. ही योजना जुनी असल्याने संपूर्ण सिमेंट पाइप आहेत. त्यामुळे ते जीर्ण झालेली आहे. यामुळे या योजनेवर आधारित ३२ गावांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.एक महिना जास्त काळापासून तरी आमच्या गावाला पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आमच्या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही योजना गेली चार-पाच वर्षे सारखी बंद पडते आणि वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही लक्ष देत नाहीत.- एकनाथ शिंदे, रहिवासी, काचलेकाम चालू असून, गेल्या महिनाभरात दोन-तीन वेळा लिकेज काढले आहेत. कालही काँक्रीट टाकले आहे, आता चालू होईल. ही योजना जुनी झाली असून त्याची तोडफोड चालू आहे. या योजनेला रेनिवेशनची गरज आहे.- जगदीश फुलपगारे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, माणगावया योजनेअंतर्गत देवळी, मूर, भिंताड, नागाव, वाक ी, हुर्डी, काचले, मढेगाव, नादवी पुरार, वनी, मलई, मलई कोंड, सोन्याची वाडी अशी अनेक गावे येतात.